सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:19 IST2025-03-31T12:19:21+5:302025-03-31T12:19:45+5:30

सदरील घरामध्ये कुठेही आग उपलब्ध नव्हती, सिलेंडरचा स्फोट झाला असे आम्हाला कळवले होते - अग्निशमन दलाची माहिती

Body of 76-year-old woman found burnt in flat; Incident in Guru Ganesh Nagar area of Kothrud | सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना

सदनिकेत 76 वर्षीय जेष्ठ महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह; कोथरूडच्या गुरु गणेश नगर परिसरातील घटना

कोथरूड : कोथरूड भागातील एका सोसायटीतील सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली. ७६ वर्षीय महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरूड भागातील गुरुगणेशननगर परिसरातील एका साेसायटीत कमल घुगे राहायला आहेत. सोमवारी (दि. ३१) सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला. घुगे यांच्या सदनिकेतून धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीररीत्या होरपळल्या होत्या. सदनिकेतील साहित्याला आग लागली नव्हती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घुगे एकट्या सदनिकेत राहायला होत्या. त्यांनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घुगे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घुगे एकट्या सदनिकेत राहत होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Web Title: Body of 76-year-old woman found burnt in flat; Incident in Guru Ganesh Nagar area of Kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.