निमगाव केतकीत आढळला एकाचा मृतदेह, तपासात खून झाल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 12:31 PM2021-04-02T12:31:17+5:302021-04-02T12:32:32+5:30
दारूच्या वादातून डोक्यात दगड मारून केला होता खून
इंदापूर: निमगाव केतकीत व्याहळी रोडवरील महालक्ष्मी मंदीराजवळ २९ मार्चला सकाळी धोंडीबा नामदेव रूपनवर (वय६०) रा. दगडवाडी हे डोक्याला जखम झालेल्या मृृृृतावस्थेत पोलिसांना आढळून आले. सुरूवातीला पोलीसांनी आकस्मात मृृृृत्युची नोंद पोलीस दप्तरी केली होती. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळाच्या तपासावरून सदरची घटना आकस्मात मृत्यू नसून खुन झाल्याचे स्पष्ट झाले. इंदापूरपोलिसांनी या घटनेबाबत एकावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोपट धोंडीराम रूपनवर (वय ३४) रा.दगडवाडी यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. तर धनाजी विठ्ठल करे (वय ३८) रा.बराल वस्ती असे गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ मार्च रात्री १० ते २९ मार्च सकाळी ९:३० च्या दरम्यान निमगाव केतकी, व्याहळी रोडवरील महालक्ष्मी मंदीराजवळ घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
फिर्यादीत म्हटले आहे, धनाजी करे याने धोंडीराम रुपनवर यांना दारूच्या नशेत त्यांच्याशी वाद विवाद करून डोक्यात दगड मारून अथवा डोके दगडावर आपटून करून खुन केला. घटनास्थळी त्यांच्या डोक्याला जखम होउन रक्तस्राव झाला होता. तसेच अंगातील कपडे रक्ताने माखल्याने घटनेचे गांभिर्य वाढले होते. घटनास्थळी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर तपासत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.