संस्थाचालकांच्या पत्नीचा पेपर प्राध्यापकाने सोडविला, पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 06:48 AM2019-01-09T06:48:33+5:302019-01-09T06:48:49+5:30
विद्यार्थिनी स्रेहल सुरेश जगताप, प्राचार्य अजित काटे, प्राध्यापक अनुराग जैन यांच्या विरुद्ध कलम ४१७, ४१९, परीक्षेत गैरव्यवहार प्रतिबंध आदी अन्वये सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : नºहे आंबेगाव येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंंग कॉलेजमध्ये संस्थाचालकांच्यापत्नीचा पेपर प्राध्यापकाने सोडवून दिल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनी (संस्थाचालकांची पत्नी), प्राचार्य व पेपर सोडवून देणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विद्यार्थिनी स्रेहल सुरेश जगताप, प्राचार्य अजित काटे, प्राध्यापक अनुराग जैन यांच्या विरुद्ध कलम ४१७, ४१९, परीक्षेत गैरव्यवहार प्रतिबंध आदी अन्वये सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. या प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. झील एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांच्या पत्नीचे इंजिनिअरिंगचे पेपर आपल्याला सोडविण्यास लावल्याची तक्रार प्राध्यापक अनुराग जैन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे १०० रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर केली होती. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.