आधुनिक युगात शरीरसंपदा सर्वात महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:54+5:302021-07-19T04:07:54+5:30
भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे आणि माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर आणि माजी सरपंच सतीश लिम्हण यांच्या प्रयत्नामुळे विंझर ...
भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे आणि माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर आणि माजी सरपंच सतीश लिम्हण यांच्या प्रयत्नामुळे विंझर येथे ओपन जीमचे साहित्य मिळाले असून आज दि.१८ रोजी माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर आणि माजी सरपंच संभाजी भोसले, सरपंच विनायक लिम्हण, उपसरपंच राहुल सागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच सतीश लिम्हण, विलास किरवे, अंकुश दसवडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, भीम आर्मीचे अध्यक्ष विनोद गायकवाड, राजाभाऊ लिम्हण, शिवराम लिम्हण, माजी सैनिक भरत भोसले, धनंजय लिम्हण, प्रदीप लिम्हण, समाज शिक्षण मंडळाचे माजी संचालक सर्जेराव भोसले, किरण भोसले, मोहन दसवडकर, चंद्रकांत चव्हाण उपस्थित होते.
संतोष दसवडकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असुन या तिस-या लाटेवर मात करावयाची असेल तर आहार व शारीरिक व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहीजे असेही दसवडकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार सरपंच विनायक लिम्हण यांनी मानले.
१८ मार्गासनी
विंझर ओपन जिमचे उद्घाटन करताना संतोष दसवडकर व इतर.