बोगस डॉक्टर गजाआड, हॉस्पिटलला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:40+5:302021-04-13T04:11:40+5:30
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत यांनी सांगितले की मेहमूद शेख (वय ३१, बुऱ्हाणपूर, रा. नांदेड) ...
याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत यांनी सांगितले की मेहमूद शेख (वय ३१, बुऱ्हाणपूर, रा. नांदेड) याने मनोज पाटील असे खोटे नाव धारण करून या भागात दोन वर्षे हॉस्पिटल चालविले. त्याने पाटील यांच्या नावाचा वापर करून मेडिकल कौन्सिल व शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आले. कारेगाव येथे शेख हा डॉ. मनोज पाटील यांचे नाव धारण करून मोरया हॉस्पिटल चालवत होता. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी या हॉस्पिटलमधील रुग्णांना इतरत्र हलवून सुविधा देण्याचे काम सुरु होते.
फिर्यादी डॉ. पाडवी यांच्याशी स्वत:ची ओळख महेश पाटील म्हणून शेख यांनी दिली.