बोगस मतदान; तिघे ताब्यात
By Admin | Published: February 22, 2017 03:06 AM2017-02-22T03:06:44+5:302017-02-22T03:06:44+5:30
महापालिका निवडणुकीत प्रभाग १० बावधन- कोथरुड डेपोमध्ये बोगस मतदानाची घटना घडली
कोथरुड : महापालिका निवडणुकीत प्रभाग १० बावधन- कोथरुड डेपोमध्ये बोगस मतदानाची घटना घडली. स्वामी विवेकानंद शाळा, मतदान केंद्र पाच येथे बोगस मतदान केलेल्या तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले हे तरुण वॉचमनचे काम करण्यासाठी पुण्यात आलेले असून सध्या कोकाटेवस्ती यथे राहात आहेत. लक्ष्मण व्यंकटी भैरवाड (वय ३५), सुरेश दहिराज चिटलेवाड (वय ३०), श्रीपती चंचलवाड (वय ३०) अशी बोगस मतदान करताना पकडलेल्यांची नावे आहेत अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष नितीन मावळे यांनी दिली. अविनाश दंडवते, पराग पासलकर आदींनी याबद्दल तक्रार केली आहे. दंडवते यांनी सांगितले की बोगस आयडी असलेल्याआणखी आठ जणांना आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले. हे सर्वजण भाजपासाठी बोगस मतदान करण्यासाठी आले होते.
प्रभाग ११ मध्येही दोन जणांना बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला म्हणून ताब्यात घेतले. (वार्ताहर)