दिवसा उकाडा तर रात्री गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:17 AM2018-02-20T07:17:41+5:302018-02-20T07:17:44+5:30
दिवसा उकाडा तर रात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली
पुणे : कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे दिवसा उकाडा तर
रात्री गारवा, अशा दोन ऋतुंचा अनुभव सध्या नागरिकांना येत आहे़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़
राज्यातील सर्व प्रमुख शहरांतील दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे़ त्या तुलनेत रात्रीच्या किमान तापमानात ही वाढ १ ते २ अंश सेल्सिअस इतकीच आहे़ त्यामुळे दिवसा उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३६़२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़
पुण्यात सोमवारी कमाल तापमान ३३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, ते सरासरीच्या तुलनेत २़२ अंश सेल्सिअसने जास्त होते़ तर, किमान तापमान १३़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ दिवसा घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर एका ठिकाणी थांबले, तरी
अंगाला चटका जाणवतो़ सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होत असल्याने रात्री गारवा जाणवत आहे़
पुढील तीन दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ २३ फेबु्रवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
प्रमुख शहरांमधील किमान तापमान
पुणे १३़८
जळगाव १२़६
कोल्हापूर १९़१
महाबळेश्वर १६़४
मालेगाव १३़६
नाशिक १२़४
सांगली १७़३
सातारा १५़१
सोलापूर १९़१
मुंबई २१़५
सांताक्रुझ १७़४
अलिबाग १९़५
रत्नागिरी १९़६
पणजी २१़४
डहाणू १७़८
भिरा १७
औरंगाबाद ११़५
परभणी १६
नांदेड १६
अकोला १६़३
अमरावती १९़२
बुलढाणा १७़२
ब्रम्हपुरी १३़४
चंद्रपूर १९
गोंदिया १३़८
नागपूर १४़६
वर्धा १६़५
यवतमाळ १७़४