‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिकेला भरत करंडक! कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली

By श्रीकिशन काळे | Published: October 13, 2024 02:42 PM2024-10-13T14:42:37+5:302024-10-13T14:43:17+5:30

बारामतीच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाला द्वितीय तर फर्ग्युसन महाविद्यालयाला तृतीय पारितोषिक

Boiled pure vegetarian drama Bharata trophy for the Kaladarshan and Natya Shringar Pune Institute won | ‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिकेला भरत करंडक! कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली

‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ एकांकिकेला भरत करंडक! कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली

पुणे : भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या भरत करंडक स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे संस्थेने बाजी मारली असून त्यांनी सादर केलेल्या ‘बॉइल्ड शुद्ध शाकाहारी’ या एकांकिकेने भरत करंडक पटकाविला.

भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत नाट्य करंडक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण आणि विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विजय कुवळेकर यांच्या हस्ते झाले. गुरुबाबा महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, कार्यवाह संजय डोळे, विश्वस्त रवींद्र खरे, उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई मंचावर होते.

‘भरत नाट्य मंदिर’चे इतर पुरस्कार

कै. अप्पासाहेब ताम्हणकर स्मृती उत्कृष्ट नाट्य कलाकार - उदय थत्ते, कै. बबनराव गोखले स्मृती उत्कृष्ट संगीत वादक - मुकुंद कोंडे, कै. उदयसिंह पाटील स्मृती सर्वोकृष्ट बालकलाकार - सार्थक फडके, कै. गोपाळराव लिमये स्मृती संस्था कलाकार (नियोजन) - मुकुंद खामकर, गुणवंत संस्था कलाकार : भरत नाट्य मंदिर - अभिजित पोतनीस, कै. अवधूत घाटे स्मृती संस्था नाट्य कलाकार - डॉ. प्रचिती सुरू, कै. गो. रा. जोशी स्मृती तेजा काटदरे पुरस्कृत नाट्यसमीक्षक/अभ्यासक - विजय कुवळेकर.

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या (बारामती) ‘पाटी’ या एकांकिकेला द्वितीय तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 11,111 एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणेच्या ‘एक दिन बीत जाएगा माटी के मोल’ला आणि दृष्टी, पुणेने सादर केलेल्या ‘नदीकाठचा प्रकार’ या एकांकिकांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचा निकाल : लेखन : प्रथम - विनोद रत्ना (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय - सई काटकर, वेदिका कुलकर्णी (11,111), उत्तेजनार्थ - निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).

दिग्दर्शन : प्रथम - आदेश यादव, सुबोधन जोशी (पाटी), द्वितीय - श्रेयस इंदापूरकर (नदीकाठचा प्रकार), उत्तेजनार्थ - निरज खेडकर, सुजल धडोती (एक दिन बित जाएगा माटी के मोल).

अभिनय : पुरुष : प्रथम - सुजल बर्गे (पाटी), द्वितीय - अमेय राजमाने (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी).
लक्षवेधी अभिनय : समृद्धी कुलकर्णी (बस नं. 1532)

अभिनय : स्त्री : प्रथम - ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय - श्रद्धा रंगारी (पाटी).
नेपथ्य : प्रथम - ऋतुजा बोठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय - प्रद्युम्न उमरीकर (11,111), उत्तेजनार्थ - श्रावणी धुमाळ, गौरव माळी (कैवारी).

प्रकाश योजना : प्रथम - अभिप्राय कामठे (बॉइल्ड शुद्ध शाकाहारी), द्वितीय - आकांक्षा पन्हाळे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ - वेदिका कुलकर्णी (11,111).

ध्वनीसंयोजन : प्रथम - मानस जोगळेकर (बस नं. 1532), द्वितीय - देवाशिष शिंदे (इंद्रायणी), उत्तेजनार्थ - श्रेयस शिराळकर, राजस शिंदे (एक दिन बित जाएगा माटी के मोल).

Web Title: Boiled pure vegetarian drama Bharata trophy for the Kaladarshan and Natya Shringar Pune Institute won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.