बॉलिवूडचा ‘टायगर’ पुणेकरांच्या भेटीला
By Admin | Published: June 3, 2017 02:40 AM2017-06-03T02:40:20+5:302017-06-03T02:40:20+5:30
मनमोहक पदलालित्यामुळे अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टायगर श्रॉफला भेटण्याची संधी पुणेकरांना मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मनमोहक पदलालित्यामुळे अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टायगर श्रॉफला भेटण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातील नंबर एकचे दैनिक असलेल्या ‘लोकमत’ने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘स्पेशल डिजिटल अॅप’द्वारे टायगरसोबत बोलताही येणार आहे.
पहिला नृत्य आणि साहसपट असलेल्या ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने टायगर पुण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील सेंट्रल मॉल येथे येत्या ५ जून रोजी सकाळी ११ वाजता टायगर चाहत्यांशी संवाद साधणार आहे. टायगरसोबत चाहते थिरकत असतानाच ‘मुन्ना मायकल’चा ट्रेलर लॉँच होणार आहे. टायगरच्या या चित्रपटाकडे बॉलिवूडचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या वर्षीचा हा सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला चित्रपट मानला जात आहे.
पुणे, भोपाळ, हैदराबाद, लखनौ आणि जयपूर या शहरातील चाहत्यांना या चित्रपटानिमित्त भेटण्याची संधी मिळत आहे. या शिवाय टायगरशी संवाद साधण्याबरोबरच नृत्य करण्याची संधीदेखील यावेळी मिळेल. चाहत्यांबरोबरच नृत्यप्रेमींसाठी देखील ही एक पर्वणी असेल.
या चित्रपटात टायगरसोबत नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय अनुभवण्यास मिळेल. तर, अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबीर खान याने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे. या चित्रपटात टायगरसोबत नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय अनुभवण्यास मिळेल. तर, अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटातून पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबीर खान याने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे.