बॉम्बच्या अफवेने कल्याणीनगरमध्ये घबराट

By admin | Published: June 2, 2017 02:36 AM2017-06-02T02:36:52+5:302017-06-02T02:36:52+5:30

कल्याणीनगर परिसरात अनोळखी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र

The bomb rumors have a panic in Kalyani Nagar | बॉम्बच्या अफवेने कल्याणीनगरमध्ये घबराट

बॉम्बच्या अफवेने कल्याणीनगरमध्ये घबराट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : कल्याणीनगर परिसरात अनोळखी बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र बॉम्ब पथकाने याची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये व्यक्तीचे कपडे असल्याचे नागरिकांना समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
उच्चभ्रू जनतेची वसाहत म्हणून कल्याणीनगर भागाची ओळख असून या ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी दुकाने व्यवसाय उभारल्याने नेहमीच परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. गुरुवारी (दि. १ ) कल्याणीनगर परिसरातील एका हॉटेलात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. त्यातच हॉटेलमधील एका टेबलावर एक बेवारस बॅग (पिशवी) हॉटेल मॅनेजरला दिसून आली. कोणी अज्ञात व्यक्तीने या बेवारस पिशवीमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरताच सर्व ग्राहक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल ाालकाने तत्काळ येरवडा पोलिसांशी संपर्क साधल्यावर येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कदम, सहायक फौजदार मोहन ढगारे, हरीश मोरे, अजित मगदूम, विनायक साळवे, शिवाजी धांडे, शरद घोरपडे, नागेश शिंगकुवर हे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर काही अनुचित घटना घडू नये, या उद्देशाने पोलिसांनी असलेली बॅग (पिशवी) शांत जागेत ठेवून त्यानंतर कदम यांनी श्वानपथक व बॉम्बपथकास याची माहिती दिली. श्वान व बॉम्बशोध पथक तत्काळ घटनेच्या ठिकाणी हजर होऊन पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये अज्ञात व्यक्तीचे कपडे आढळून आल्यानंतर सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या वेळी परिसरात एकच गर्दी जमली होती.

यापूर्वीदेखील कल्याणीनगरलगत असणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती. अनेक निष्पाप जीवांना जीव गमविण्याची वेळ आली होती. त्याप्रसंगाची जर्मन बेकरीपासून नजीकच असलेल्या कल्याणीनगरमधील संबंधित हॉटेलमधील तथाकथित बॉम्ब प्रकरणाची आठवण उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
याबरोबरच अशा गंभीर स्वरूपाच्या घटनांना आळा बसावा या उद्देशाने पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी पोलीस पथकासह महत्त्वाच्या ठिकाणांची आठवडाभरापूर्वीच पाहणी करून असणाऱ्या त्रुटींची माहिती हॉटेल व्यावसायिकांना दिली होती. यानंतर ही बॅग (पिशवी) हॉटेलमध्ये आलेला एक ग्राहक विसरून गेल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याची बॅग (पिशवी) त्याच्या ताब्यात दिली.

Web Title: The bomb rumors have a panic in Kalyani Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.