कानगावला महावितरणविरोधात बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:45+5:302021-08-27T04:14:45+5:30
कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. ...
कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही.
परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय पूर्ण आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध, फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपूर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारीमध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही. परंतु महावितरण कंपनीमुळे आज कानगावसहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरणने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेली आहेत. तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.
कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महावितरणने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा २६ ऑगस्टपासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार, भानुदास शिंदे ,संतोष शेलार, सयाजी मोरे, उत्तम खांदवे, रामदास कोऱ्हाळे, संतोष गवळी, रामदास पवार, भानुदास माळवदकर यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
२६ फोटो दौंड आंदोलन
कानगाव येथे शेतकऱ्यांकडून ऊर्जामंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.