कळंबमध्ये बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:11+5:302021-05-22T04:10:11+5:30
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीच्या आदेशाला सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून तो आदेश ...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांतून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी मंजुरीच्या आदेशाला सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध करून तो आदेश रद्द केला. या निर्णयाचे तीव्र पडसाद इंदापूर तालुक्यातील विविध भागात उमटू लागले. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी मंजूर आदेश रद्द करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. याचा कळंब गावातील शेतकऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून बोंबाबोंब आंदोलन करत सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. यावेळी कळंब विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब अर्जुन, अरूण चव्हाण, रमेश कोळी, सागर मिसाळ, संजय खरात, संदीपान चितारे, अतुल सावंत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मेटकरी, राजेंद्र डोंबाळे, संदीप पाटील, योगेश डोंबाळे, प्रमोद खंडागळे आदी मान्यवर व कळंब ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळी: उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी मंजुरी आदेश रद्द केल्यामुळे कळंब परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून बोंबाबोंब आंदोलन केले.
२१०५२०२१-बारामती-२०
------------------------