बारामतीतील बोगस कोतवाल भरतीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:48 AM2018-04-06T02:48:37+5:302018-04-06T02:48:37+5:30

बारामती येथील तहसील कार्यालयातील कोतवाल भरतीतील बनावट कागदपत्रांच्याआधारे एका महिलेची भरती केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

Bombs in Baramat Kotwal recruitment busted | बारामतीतील बोगस कोतवाल भरतीचा पर्दाफाश

बारामतीतील बोगस कोतवाल भरतीचा पर्दाफाश

googlenewsNext

बारामती - येथील तहसील कार्यालयातील कोतवाल भरतीतील बनावट कागदपत्रांच्याआधारे एका महिलेची भरती केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मेडद या गावातील काजल शिवाजी हिवरकर यांना डावलून अक्षदा शैलेश नेवसे यांची नेमणूक देण्यात आली. त्यामुळे काजल हिवरकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर बनावट कागदपत्रांचे पुरावेच सादर केले. कोतवाल भरतीचा हा प्रकार उघड झाल्यामुळे महसूल प्रशासनाची तारांबळ उडाली.
याबाबत तहसीलदार हनुमंत पाटील यांना भाजपचे अविनाश मोटे यांनी विचारणा केली. यावरून त्यांच्यात चांगलीच खंडाजंगी झाली. अखेर तहसीलदार पाटील यांनी दोन दिवसात याबाबत चौकशी करून निर्णय दिला जाईल, असे सांगितले. कागदोपत्री पूर्तता केली असताना हिवरकर यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे न्यायाची प्रतिक्षा कशी करायची, असा प्रश्न मोटे यांनी तहसीलदारांना विचारला.
याबाबतची हकीकत अशी की, मेडद तालुका बारामती येथील कोतवाल पदाकरीता ९/२/२०१८ रोजी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जामध्ये स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यात येणार असे स्पष्ट करण्यात आले होते. यावरून काजल हिवरकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे अक्षदा नेवसे यांनीही अर्ज दाखल केला. अक्षदा नेवसे यांनी तहसीलदारांनी दाखल केलेल्या अर्जात मेडद येथील रहिवासी दाखविले.
मात्र प्रत्यक्षात नेवसे यांची आधारकार्डची प्रत, युनिट रजिस्टर प्रत नावासहित, ग्रामपंचायतीचा कर भरत असलेली पोच पावती, ग्रामपंचायतीकडील कर आकारणीचा नोंदवहीचा उतारा, आदी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. अशी स्पष्ट माहिती तहसील कार्यालयाने हिवरकर यांना दिली. याचवेळी १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर तहसील कार्यालयातील रेकॉडमधील कर्मचारी शैलेश विजय नेवसे यांनी १५ वर्ष आईवडिलांसह भाडेकरू म्हणून रहात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र प्रत्यक्षात नेवसे कुटूंबिय हे कसबा येथे रहात असल्याचे निष्पन्न होत आहे. एवढेच नव्हे तर मेडदच्या तलाठ्यांनी ९ मार्च २०१५ चा रहिवासी दाखला हा चुकीच्या पध्दतीने दिला आहे.
नेवसे यांच्या रेशनकार्डमध्ये खाडाखोड करण्यात आली असून कसबा बारामती याला कंस करून मेडद ३५ पायऱ्यांजवळ रहात असल्याचे दाखवून उत्पन्न तर अवघे २५ हजार रुपये दाखविण्यात आले आहे. एका सरकारी कर्मचाºयाचे उत्पन्न अवघे २५ हजार दाखवून अक्षरश: कहर केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात गट क्र. १० चा नेवसे यांनी सातबारा जोडलेला आहे. याच्यात कोठेही शैलेश नेवसे यांचा उल्लेख नाही यावरून तहसील कार्यालयातील विविध यंत्रणांचा वापर करून हे प्रकरण बनावट असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे अक्षदा नेवसे यांचे मतदार यादीतील नाव बारामती कसबा येथे आहे. ग्रामस्थांना याबाबत विचारले असता शैलेश व अक्षदा नेवसे हे बारामतीमध्ये रहात असून मेडदमध्ये रहात नाहीत, असे सांगण्यात आले. यावरून या बनावट प्रकरणाचा पडदा फार्श झाला आहे.

या प्रकरणात काजल हिवरकर यांच्यावर प्रचंड दबाव आणून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मुळ प्रश्नांना बगल देवून न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो याचे कारण हिवरकर हे गरीब कुटूंब असून त्यांच्यावर तहसील प्रशासनाने अन्याय केल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अविनाश मोटे यांनी तहसीलदारांना चर्चा करावयाची आहे, असे म्हटल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर पडून चालत चालत बोलू या असे सांगून गाडीपर्यंत आले परंतू मोटे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवू शकले नाहीत.

Web Title: Bombs in Baramat Kotwal recruitment busted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.