महावितरणविरोधात बोंबाबोंब, राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:05 AM2018-01-02T02:05:05+5:302018-01-02T02:05:20+5:30
शेतक-यांची संपूर्ण बिलमुक्ती करण्यात यावी, सक्तीची वसुली थांबवावी, शेती व घरगुती वीजजोड तोडणी थांबवावी, शेतकरी व ग्राहकांशी उद्धट आणि उर्मट वागणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, रोहित्र बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी शेतक-यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केडगाव (ता. दौैंड) महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन
केडगाव : शेतक-यांची संपूर्ण बिलमुक्ती करण्यात यावी, सक्तीची वसुली थांबवावी, शेती व घरगुती वीजजोड तोडणी थांबवावी, शेतकरी व ग्राहकांशी उद्धट आणि उर्मट वागणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, रोहित्र बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी शेतक-यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केडगाव (ता. दौैंड) महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आले.
या वेळी तालुक्यातील वेगवेगळ्या भागामध्ये महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा कुठलीही पूर्व सूचना न देता अचानकपणे खंडित केल्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी मांडल्या. कार्यकारी अभियंतांच्या दालनातच आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. संपूर्ण वीजबिलमुक्ती झालीच पाहिजे. ‘गांधी की लढाई गोरो से, हमारी लढाई चोरो से’, ‘कोण म्हणतो देत नाय घेतल्याशिवाय राहत नाय’ अशा शब्दांत महावितरण कार्यालयाच्या विरोधात आणि सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष माऊली शेळके, महिला राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्षा
वैशाली नागवडे, विकास खळदकर, नितीन दोरगे, रामभाऊ चौधरी, मीनाताई धायगुडे, सुशांत दरेकर,
सनी हंडाळ अजित शितोळे, दिलीप हंडाळ, संभाजी ताकवणे आदी उपस्थित होते.
कारवाईचे आश्वासन
सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरण कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाºयांनी येथून पुढे शेतकºयांच्या कृषिपंपाचे विद्युतजोड सक्तीच्या वसुलीसाठी खंडित केले जाणार नाही, तसेच उद्धट आणि उर्मट वागणाºया अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सरकारकडून विश्वासघात
कानगाव शेतकरी आक्रोश आंदोलना वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीजबिलासाठी शेतकºयांचा विद्युत पुरवठा खंडित करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ज्या तालुक्यातून हे आंदोलन सुरू झाले, त्याच तालुक्यात महावितरण कंपनकडून शेतकºयांच्या सक्तीच्या वसुलीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे सरकार आणि महावितरणकडून शेतकºयांचा विश्वासघात झाला आहे.
- माऊली शेळके, अध्यक्ष, राष्ट्रवादी किसान सेल, पुणे जिल्हा