पुण्यातील अघोरी प्रकार; मुल होत नाही म्हणून विवाहितेला खाऊ घातली घुबडाचे पाय अन् कोंबड्याच्या मुंडक्याची पावडर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:31 AM2023-01-19T11:31:17+5:302023-01-19T11:39:47+5:30

एका अमावस्येच्या दिवशी रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन तेथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली व राख मडक्यात घेतली...

bones of a dead man, the feet of an owl, and the powder of a chicken's head were fed to the bridegroom | पुण्यातील अघोरी प्रकार; मुल होत नाही म्हणून विवाहितेला खाऊ घातली घुबडाचे पाय अन् कोंबड्याच्या मुंडक्याची पावडर

पुण्यातील अघोरी प्रकार; मुल होत नाही म्हणून विवाहितेला खाऊ घातली घुबडाचे पाय अन् कोंबड्याच्या मुंडक्याची पावडर

googlenewsNext

- विवेक भुसे

पुणे : मुलबाळ होत नसल्यामुळे आघोरी पूजा करुन त्यात मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके याचा वापर केला. त्यानंतर हाडाची पावडर करुन विवाहितेला जबरदस्तीने खायला लावली. तसेच स्मशानभूमीतून हाडे, राख आणून त्याची पूजा करुन ती राख पाण्यात मिसळून विवाहितेला पिण्यास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धायरी येथील विवाहितेच्या सासरी हा प्रकार २७ एप्रिल २०१९ पासून सुरु होता. अ‍ॅड. हेमंत झंझाड यांच्या पुढाकाराने सिंहगड रोड पोलिसांनी तिच्या सासरच्याकडील लोकांवर विवाहितेचा छळ तसेच महा नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पती जयेश पोकळे, दीर श्रेयश पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती कृष्णा पोकळे, दीपक जाधव, बबिता जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत २८ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बी ई कॉम्प्युटर शिक्षण झाले आहे. त्यांचे जयेश पोकळे याच्याबरोबर २७ एप्रिल २०१९ रोजी विवाह झाला. त्याअगोदर वेस्टइन या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. साखरपु्ड्याला आलेल्या सासरकडील ४५ महिलांना चांदीची जोडवी देण्यास भाग पाडले. लग्नात ८० तोळे दागिने, साडेपाच लाखांची सेलेरीओ कार देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे त्यांनी ती दिली. त्यानंतर प्रत्येक सणाला त्यांची मागणी होत होती. सोन्याची चैन, ब्रेसलेट, अंगठ्या असे २५ ते ३० तोळे सोने जयेशला तसेच ५० ते ५५ तोळे सोने फिर्यादीला तिच्या वडिलांनी दिले. जून २०२० मध्ये गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये दिले.

विवाहितेच्या सासरवाडीकडील लोक प्रत्येक अमावेस्येला एकत्र जमून काळे कपडे घालून तळघरातील सहस्यमय खोलीमध्ये काही तरी करत असत. कोरोना महामारीच्या काळात तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती ढासळायला लागली. त्यामुळे २२ मे २० रोजी अमावस्येच्या दिवशी त्यांनी अघोरी पूजा मांडली. टाचणी लावलेली लिंबू, काळ्या बाहुल्या, मिरची, हळदी कुंकु, बुक्का असे होते. फिर्यादीच्या जावेने कोणत्यातरी महिलेला व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल लावून ती सांगेल, त्याप्रमाणे पूजा केली. व्यावसायिक भरभराटीसाठी व फिर्यादीला मुलबाळ होत नाही, यासाठी प्रत्येक अमावस्येला अघोरी कृत्य जास्त होत आहे.

एका अमावस्येच्या दिवशी रात्री तिचे दीर, जाऊ, पतीसह सर्व जवळच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन तेथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली व राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली. त्यानंतर मडक्यातील राख पाण्यामध्ये मिक्स करुन ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिले. या प्रकारानंतर ११ फेबुवारी २०२१ रोजी जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय व कोंबड्याचे मुंडके हे सर्व  जावेच्या आईवडिलांनी अगोदर आणले होते. मांत्रिक महिलेने अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करुन ती फिर्यादी यांना खायला सांगितली. त्याला तिने नकार दिल्यावर जावेचे वडिल दीपक जाधव यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हर काढून ते तिच्या डोक्याला लावून जबरदस्तीने पावडर खाण्यास भाग पाडले.

तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार आणखी तीन चार वेळा झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे तिला मळमळ व उलट्या होऊ लागल्या. अंगावर रिअ‍ॅक्शन आली. तरीही तिचे सासरकडील तिला दर अमावस्येला पूजा करायला लावत. तु वांझोटी आहे, तुझ्यामुळे आमची आर्थिक प्रगती कमी झाली. तू पांढर्‍या पायाची आहे, असे बोलून छळ करीत आहेत. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये जयेश याला क्रेटा गाडी घेण्यासाठी तिच्या वडिलांनी ८ लाख रुपये दिले. तरीही ते तुझ्या वडिलांना सांगून अर्धा हिस्सा देण्याची मागणी करीत होते. हा अघोरी प्रकार सुरु होता. मुलबाळ होत नाही व आई वडिलांनी पैसे देणे बंद केल्यामुळे फिर्यादी यांना २६ मे २०२२ रोजी घरातून हाकलून दिले. त्यानंतर माहेरी आल्यावर त्यांनी नांदण्यास जाण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला. पंरतु त्यांनी दाद न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असल्याचे त्यात म्हटले आहे.

Web Title: bones of a dead man, the feet of an owl, and the powder of a chicken's head were fed to the bridegroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.