बुकिंग आगाऊ; खरेदी मुहूर्तावर
By admin | Published: October 27, 2016 05:10 AM2016-10-27T05:10:07+5:302016-10-27T05:10:07+5:30
नवीन वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर दोन टक्के सरचार्ज वाढला आहे़ सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने नवीन वाहन खरेदी करणा-या ग्राहकांच्या खिशाला
पिंंपरी : नवीन वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर दोन टक्के सरचार्ज वाढला आहे़ सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने नवीन वाहन खरेदी करणा-या ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. त्यामुळे अनेक शोरुमधारकांनी ग्राहकांकडून आगाऊ बुकींग करून घेऊन, दिवाळीतील मुहूर्तावर
गाड्यांचे वितरण करण्याची शक्कल लढविली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ग्राहकांनी खरेदी केलेल्या नवीन वाहनांच्या डिझेल वाहनांवर ११ टक्के कर आकारला जातो़ पेट्रोल वाहनांवर ९ टक्के कर आकारला जातो़ तसेच १० लाखांच्या पुढे किं मत असणाऱ्या वाहनांवर १२ टक्के कर आकारला जातो़ दुचाकी खरेदी करताना एकदाच कर भरावा लागतो़ नवीन नियमाप्रमाणे आता त्या करावर सोमवारपासून दोन टक्के जादा अधिभार लागू झाला आहे़ गेल्या काही वर्षांच्या तुलनेत राज्यात वाहनांचा खरेदीचा आलेख वाढत चालला आहे़ वाहनांच्या वर्गवारीनुसार कर आकारण्याचे नियम परिवहन विभागाला आहेत़ शोरूमद्वारे वाहन खरेदीवेळी ग्राहकांकडून सर्व कर आकारले जातात़
दिवाळीच्या निमित्ताने शहरातील अनेक नागरिकांनी दुचाकी आणि वाहनांच्या अनेक शोरूमध्ये जादा अधिभार द्यावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे़ महागाई वाढत असताना त्यात शासनाकडून वाहनांच्या रोड टॅक्सच्या रकमेवर जादा कर आकारणीमुळे अनेकांनी या निर्णयाबद्दल रोष प्रकट केला आहे़ काहींना नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती असल्याने, कर चुकविण्यासाठी त्यांनी मागील महिन्यातच बुकिंग केले. (प्रतिनिधी)
खरेदीदारांना फटका : २४ पासून अंमलबजावणी
शासनाच्या आदेशाप्रमाणे रोड टॅक्स रकमेवर दोन टक्के अधिभार वाढला आहे़ त्याची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे़ बहुतांश बड्या किमतीच्या गाड्यांच्या रकमेवर वाढीव कराचा फ टका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
ग्राहकांना नाही पत्ता
विशेषत: बँ्रड गाड्या घेणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फ टका बसला आहे़ त्यांना सुमारे दोन ते दहा हजारांचा जादा कर भरावा लागत असल्याचे सांगितले़ वाहनांची एकत्रित किंमत सांगितली जात असल्याने ग्राहकांना नवीन करवाढीचा पत्ता लागत नाही़ मात्र, गाडीच्या खर्चाचे विवरण पाहिल्यानंतर कर वाढल्याचे लक्षात येते़ नवीन वाहनांच्या रोड टॅक्स रकमेवर दोन टक्के अधिभार वाढल्यामुळे ग्राहक नाराज झाल्याची माहिती शोरूममालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़