बेटिंगच्या अॅपद्वारे बुकींनी कमविले सव्वा कोटी
By admin | Published: October 12, 2014 01:54 AM2014-10-12T01:54:29+5:302014-10-12T01:54:29+5:30
क्रिकेट, टेनिस, सॉकर व इतर खेळांचे बेटिंग घेण्यासाठी मोबाइल अॅप बनवून त्याच्या माध्यमातून बुकींनी सव्वा कोटी रुपये कमाविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
Next
>पुणो : क्रिकेट, टेनिस, सॉकर व इतर खेळांचे बेटिंग घेण्यासाठी मोबाइल अॅप बनवून त्याच्या माध्यमातून बुकींनी सव्वा कोटी रुपये कमाविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अॅप बनविणा:याला पोलिसांनी अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला 13 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
एकांक्ष राजेंद्रकुमार जैन (33) असे आरोपीचे नाव आहे. जैन याने मोबाइल अॅप तयार करून 2क् बुकींना विकले. याच्या माध्यमातून बुकींनी 1 कोटी 24 लाख रुपयांचा नफा कमविला. जैन हा अनेक बुकींच्या संपर्कात असल्याची माहिती उजेडात आली आहे. आयपीएल 7 मध्ये बेटींग करण्यासाठी संकेतस्थळ बनविल्याप्रकरणी मुंबई पोलीसांनी जैन याला यापूर्वी अटक केली होती. त्यातून जामीनावर सुटल्यानंतर त्याने हे अॅप केल्याचे उघड झाले आहे.