पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:20+5:302021-06-02T04:09:20+5:30
पुणे : मनोबल वाढविण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातून माणसाला उमेदही मिळत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या ...
पुणे : मनोबल वाढविण्यासाठी साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातून माणसाला उमेदही मिळत असते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांच्या दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही पत्र पाठवले आहे.
सर्व दुकानांना दुपारी दोनपर्यंत परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांची जी दुकाने आहेत आणि विशेषत: वेगवेगळ्या प्रकारची मराठी साहित्यांची दुकाने आहेत, ती आणि अन्य भाषिक पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती नीलम गो-हे यांनी केली आहे. इतर वस्तुंप्रमाणे पुस्तकेसुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था जे दुकानदार करतील, त्यांना तशी परवानगी द्यावी. त्यासाठी त्वरित पुस्तकांच्या दुकानांबाबतचे निर्बंध आपण बदलून त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी नीलम गो-हे यांनी पत्रात केली आहे.
--------------------------------------------------------------