बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरण; आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 23:40 IST2024-10-12T23:40:15+5:302024-10-12T23:40:55+5:30
न्यायालयाने २५ वर्षीय आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरण; आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे.आरोपींनी पीडितेकडे असलेली चेन चोरली असून, ती जप्त करायची आहे, असे सांगत सरकारी वकिलांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती मान्य करत न्यायालयाने २५ वर्षीय आरोपीला १५ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
येवलेवाडी परिसरातून अटक केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी, सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी युक्तिवाद केला की, आरोपी रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अन्य साथीदार अद्याप फरार आहे. त्यांच्या ठाव ठिकाण्याच्या अनुषंगाने आरोपीकडे तपास करायचा असून त्यांना अटक करायची असल्याचे न्यायालयास सांगितले. .