बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:41 PM2024-10-11T18:41:53+5:302024-10-11T18:43:28+5:30

Bopdev Ghat Case in Marathi: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठं यश आलं. ७०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी या प्रकरणात वेगवेगळ्या पातळीवर तपास करत आहेत.  

Bopdev Ghat rape case: How many accused have Pune police arrested so far? | बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?

बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?

Bopdev Ghat Case Updates: पुण्याजवळील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवलं. धमकावलं. त्यानंतर तरुणांचे शर्टाने हातपाय बांधले आणि तरुणीवर अत्याचार केले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणेपोलिसांना पहिलं यश मिळालं आहे.   
 
बोपदेव सामूहिक बलात्कार प्रकरण, पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, "सीसीटीव्ही पडताळणी आणि टेक्निकल डेटाचे विश्लेषण, स्थानिक पातळीवरून मिळालेली माहिती या सगळ्याचा आधार घेऊन हा गुन्हा उघड करण्यास यश मिळाले आहे. या कामासाठी पुणे शहर गुन्हे शाखा, ७०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या स्तरावर काम करत होते. यामुळे आम्हाला काही सकारात्मक लीड मिळाली."

दोन आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना

"त्या आधारे आज पहाटे पहिले यश मिळाले आहे. एका आरोपीला अटक केली आहे. इतर दोन आरोपींना शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आमची पथके रवाना करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर इतर आरोपी आम्हाला सापडतील", अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

सामूहिक बलात्कार प्रकरणात तीनच आरोपी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "जे दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणी भविष्यात कुणावरही अशा प्रकारची घटना होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य उपाययोजना मग ते लाईट असेल, सीसीटीव्ही आणि इतर आवश्यक पाऊले उचलली जातील. या प्रकरणात तीन आरोपींची नावे एफआरआयमध्ये आहेत. आतापर्यंतच्या तपासातही तीनच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे."

आरोपींना शोधण्यात वेळ का लागतोय?

"त्या परिसरात सीसीटीव्हीचे प्रमाण कमी असल्याने आम्हाला वेळ लागला. त्याचबरोबर आरोपी प्रोफेशनल व्यक्तीसारखे वागत असल्याने ते सीसीटीव्ही असलेल्या मार्गावरून न जाता त्यांनी छोट्या रस्त्यांचा वापर केला. त्यामुळे आम्हाला सीसीटीव्ही पडताळणी जास्त बारकाईने आणि मोठ्या प्रमाणात करावी लागली", असे अमितेश कुमार यांनी सांगितले. 

Web Title: Bopdev Ghat rape case: How many accused have Pune police arrested so far?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.