Pune : बोरीभडकला लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय; ४ तरुणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 14:11 IST2022-10-14T14:10:22+5:302022-10-14T14:11:35+5:30
६ जणांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल...

Pune : बोरीभडकला लॉजवर सुरू होता वेश्याव्यवसाय; ४ तरुणींची सुटका
यवत (पुणे):पुणे-सोलापूर महामार्गावर बोरीभडक (ता. दौंड) गावचे हद्दीतील एका लॉजवर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ तरुणींची सुटका केली. लॉज मालकास व्यवस्थापक असे एकूण ६ जणांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग (एएचटीयु) चे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिली.
बोरीभडक गावचे हद्दीत एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी संबंधित ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठविले. तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून सायंकाळी अचानकपणे छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी चार तरूणी आढळून आल्या.