बोरीपारधी संमिश्र बहुमत; सत्तेच्या चाव्या आनंद थोरात यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:48+5:302021-01-20T04:11:48+5:30

बोरीपार्धी येथे विजयी रमेश थोरात समर्थक उमेदवारांच्या सत्कार समारंभात आनंद थोरात सहभागी झाले होते. आनंद थोरात तरी भाजपवासी असले ...

Boripardhi composite majority; The keys of power are in the hands of Anand Thorat | बोरीपारधी संमिश्र बहुमत; सत्तेच्या चाव्या आनंद थोरात यांच्या हातात

बोरीपारधी संमिश्र बहुमत; सत्तेच्या चाव्या आनंद थोरात यांच्या हातात

Next

बोरीपार्धी येथे विजयी रमेश थोरात समर्थक उमेदवारांच्या सत्कार समारंभात आनंद थोरात सहभागी झाले होते. आनंद थोरात तरी भाजपवासी असले तरी स्थानिक पातळीवर सर्व जण त्यांना मानतात. राहुल कुल समर्थक बाळासाहेब सोडनवर (१८० मतांनी), संगीता सुरेश ताडगे (२५० मतांनी), सोमनाथ गडधे (४ मतांनी) विजयी झाले आहेत. रमेश थोरात समर्थक सुनील सोडनवर (४८० मतांनी) माजी सरपंच सरला शर्मा (६४३ मतांनी) शेखर सोडनवर ( १३० मतांनी) त्रिंबक सोडनवर यांचे स्नुषा सपना सोडनवर (२८० मतांनी) विजयी झाले आहेत. चुरशीच्या लढतीत ज्योती संपत मगर यांनी मनीषा गणेश महाडिक यांचा १० मतांनी पराभव केला.

विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेली मते) - प्रभाग १- सोमनाथ धोंडीबा गडधे(६२३), उदागे जयश्री विकास (६४८), मनीषा योगेश कोळपे (६२३). प्रभाग २ - नेवसे अनिल बाबुराव (७२५), सोडनवर सुनील नारायण (६८४), शर्मा सरला राजेंद्र (७३४). प्रभाग ३ - सोडणवर बाळू दशरथ (३३०), बर्वे मनीषा सुभाष (२८८). प्रभाग चार-अडसूळ अशोक भागुजी (६५३), सोडणवर शेखर दत्तात्रेय (६५८), ताडगे संगिता सुरेश (६८१). प्रभाग ५ -अभिषेक आनंद थोरात (बिनविरोध) रोहिणी दत्तात्रय नेवसे (बिनविरोध), मगर ज्योती संपत (४२४). प्रभात ६- सुनंदा राजेंद्र भोसले (बिनविरोध), सपना बंडू कोळपे (९०२) गायकवाड आम्रपाली उद्धव(८८८)

--

फोटो क्रमांक : १९ केडगाव बोरीपार्धी ग्रामपंचायत

फोटो ओळ- बोरीपार्धी तालुका दौंड येथे विजयी उमेदवारांसोबत जल्लोष करताना आनंद थोरात

Web Title: Boripardhi composite majority; The keys of power are in the hands of Anand Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.