आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: March 30, 2015 05:29 AM2015-03-30T05:29:37+5:302015-03-30T05:29:37+5:30
नाणेकरवाडी येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सासू व नवऱ्यास अटक करण्यात आली.
Next
चाकण : नाणेकरवाडी येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सासू व नवऱ्यास अटक करण्यात आली.
नवरा- संजय अमृत जाधव व सासू गिताबाई अमृत जाधव यांच्यावर भा.द.वि. कलम ४९८ व ३०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मंगल संजय जाधव (वय३३) हिचे वेळोवेळी मारहाण करुन जगणे असहय्य केले व आत्महत्येस प्रवृत्त केले. दि. २३ मार्च २०१५ रोजी मंगल हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ससून रुग्णालयात उपचार चालू असताना २७ मार्च, २०१५ रोजी तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)