फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: January 11, 2017 03:40 AM2017-01-11T03:40:55+5:302017-01-11T03:40:55+5:30

इक्विटास कंपनीकडून कर्ज घेऊन बस घेतली. त्या बसचे कर्ज तर फेडलेच नाहीच; उलट परस्पर बसची विक्री करून कंपनीची

Both arrested in fraud case | फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

फसवणूक प्रकरणी दोघांना अटक

Next

पुणे : इक्विटास कंपनीकडून कर्ज घेऊन बस घेतली. त्या बसचे कर्ज तर फेडलेच नाहीच; उलट परस्पर बसची विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. या दोघांना ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
राहुल भगवान वायसे (वय ३२, रा. नऱ्हे) आणि खुर्शीद सुलेमान शेख (वय ५०, रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत इक्विव्टास कंपनीचे व्यवस्थापक वसीम मेहबूब पठाण (वय २८, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०१३ ते १३ जून २०१४ यादरम्यान घडली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी वायसे आणि शेख या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. भगवान रामचंद्र वायसे (रा. नऱ्हे) याच्या शोधासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली.

Web Title: Both arrested in fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.