पर्स हिसकावणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:41 AM2018-08-28T02:41:59+5:302018-08-28T02:42:52+5:30

Both of the arrestees have been arrested | पर्स हिसकावणाऱ्या दोघांना अटक

पर्स हिसकावणाऱ्या दोघांना अटक

Next

पुणे : रस्त्यावरून जाणाºया सायकलस्वार महिलेची पर्स हिसकावून नेल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दोघांना अटक केली. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता रस्त्याने चालणाºया इतर नागरिकांचे मोबाईल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलीसांनी त्यांच्याकडून बारा मोबाईल, एक दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी बी. एस. गायक वाड यांनी दोघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

आकाश संजय गायकवाड (वय २१) व प्रदीप बाळासाहेब भोसुरे (वय २१, दोघेही रा. धानोरे, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कर्वेनगर परिसरातील ३८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. १३ आॅगस्ट रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास कर्वेनगर परिसरात ही घटना घडली.

फिर्यादी या एमएसईबी आॅफीसजवळून पायी चालल्या होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी यांच्या सायकलच्या कॅरिअरवर लावलेली त्यांची पर्स हिसकावून नेली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गायकवाड, भोसुरे यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील रस्त्याने चालणाºया इतर नागरिकांचे मोबाईलदेखील हिसकावून चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी, आरोपींकडून ताब्यातून जप्त केलेले मोबाईलचे मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी, जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील वैशाली पाटील यांनी केली.

दोन लाखांचा ऐवज जप्त ; तीन चोरट्यांना अटक
पुणे : बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांच्या गळ््यातील सोनसाखळ््या चोरून नेणाºया तीघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी केलेले सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी २ लाख ५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. साई लिंगाप्पा जाधव रा. आनंदनगर, भोईराज सोसायटी,मुंढवा कॅम्प, बसवराज चंदु जाधव आणि शुभम दशरथ सुर्यवंशी दोघे रा. रा.सर्वोदय कॉलनी, मुंढवा असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालीत होते. यावेळी जनसेवा बँकेच्या बसथांब्याजवळ काही युवक चोरी करण्याच्या उद्देशाने उभा आहेत आहे अशी माहिती पोलीस शिपाई अमित कांबळे खबºयांकडून मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस हवालदार युसुफ पठाण, कुसाळकर, शाहिद शेख, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे आदीच्या पथकाने सदर ठिकाणी धाव घेतली. बसथांब्याजवळ तीन युवक संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Both of the arrestees have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.