कंटेनर-डंपरच्या धडकेत दोघे ठार

By admin | Published: May 12, 2017 04:49 AM2017-05-12T04:49:47+5:302017-05-12T04:49:47+5:30

शिरूर-न्हावरे रस्त्यावर करडे घाटाजवळ कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार

Both of the container-dumpers killed | कंटेनर-डंपरच्या धडकेत दोघे ठार

कंटेनर-डंपरच्या धडकेत दोघे ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : शिरूर-न्हावरे रस्त्यावर करडे घाटाजवळ कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. या अपघातावेळी एक कार कंटेनरला मागील बाजूने धडकली. सुदैवाने यात कारचालक बचावला, तो किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे अडीच तास वाहतूक ठप्प झाली.
डंपरचालक सुनील पवार (रा. सरदवाडी, शिरूर, मूळ रा. परभणी) व कंटेनरचालक सोनुप्रसाद शिवशंकर शर्मा हे दोघे जागीच ठार झाले. आज सकाळी सकाळी अकराच्या दरम्यान सरदवाडी येथील रवींद्र कर्डिले यांच्या खडी क्रशरमधन खडी भरलेला डंपर घेऊन चालक पवार हा न्हावरे बाजूला निघाला होता.
याच दरम्यान कन्ट्रीलाइन लॉजिस्टीक कंपनीचा माल भरलेला कंटेनर करडे घाट उतरुन शिरूरच्या दिशेने जात असताना घाटाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की, दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. यात दोघेही चालक अडकले. जबर मार लागल्याने दोघेही जागेवरच मृत पावले. कंटेनरला मागील बाजूने येणारी एक कार या अपघाातामुळे कंटेनरला धडकली. यात कारचालक किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली. तत्पूर्वी रवींद्र कर्डिले व त्यांचे सहकारीही घटनास्थळी पोहोचले. वाहनांत अडकून पडलेल्या वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलीस येण्यापूर्वी व आल्यानंतरही आसपासच्या ग्रामस्थांनी, तरुणांनी घटनास्थळी मदतीचा हात दिला. कर्डिले यांच्यासह बंटी कुंडलिक, अमोल वर्पे, दत्ता केदारी, सुभाष चौधरी, संतोष सरोदे, राहुल महाजन यांच्यासह इतर तरुणांनी चांगली मदत केली. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
शिरूर-न्हावरे या रस्त्यावर न्हावरे-फाटा ते न्हावरे (चौफुला) या रस्त्यावर दोन मोठी वाहने समोरासमोरून जाताना अगदी खेटून जातात. यात अतिवेग असेलतर अपघाताची शक्यता संभवतेच.

Web Title: Both of the container-dumpers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.