ललित कला केंद्राचे दोघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:58+5:302021-09-03T04:11:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलाच्या सौरभ मेश्राम आणि बिपिन घोबाळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलाच्या सौरभ मेश्राम आणि बिपिन घोबाळे या दोन माजी विद्यार्थ्यांची दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) रंगमंडलात (रेपरटरी) कलाकार म्हणून निवड झाली आहे.
सौरभ मेश्राम आणि बिपिन घोबाळे हे दोघेही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले आहेत. सौरभ हा चंद्रपूर जिल्ह्यातील मिनघरी येथील असून बिपिन घोबाळे हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील आहे. सौरभ याने तीन वर्षांपूर्वी ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्र विषयात करून नंतर एनएसडीमधून तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम २०२० मध्ये पूर्ण केला. तर, बिपिन यांने ललित कला केंद्रामधून २०२० मध्ये नाट्यशास्त्र विषयामध्ये एम. ए. पदवी संपादन केली आहे. ललित कला केंद्राच्या या दोन माजी विद्यार्थ्यांची अखिल भारतीय निवडीतून दिल्लीच्या नॅशनल थिएटर रिपरटरीमधे कलाकार म्हणून निवड झाली आहे, अशी माहिती ललित कला केंद्राचे माजी प्रमुख सतीश आळेकर यांनी दिली.
.....................................