बनावट कागदपत्रांद्वारे १५९ सिम घेणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:18 PM2018-03-26T21:18:08+5:302018-03-26T21:18:08+5:30

एस.के.टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या फर्मच्या नावाने खोटी कागदपत्रे देऊन आयडीया कंपनीची १५९ सिम व कमीशनचे ४७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

Both person arrested for 159 simcard purches with fake documents. | बनावट कागदपत्रांद्वारे १५९ सिम घेणा-या दोघांना अटक

बनावट कागदपत्रांद्वारे १५९ सिम घेणा-या दोघांना अटक

Next
ठळक मुद्दे याप्रकरणी निलेश तापकिर (वय ३३, रा.नाना पेठ) यांनी दिली फिर्याद

पुणे : बनावट कागदपत्रे देऊन आयडीया कंपनीची १५९ सिमकार्ड घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार चंदननगर येथे घडला. याप्रकरणी चंदननगर पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. मोहसीन सलीम पठाण (वय १९, रा.शिवनेरी नगर, कोंढवा) आणि हर्षल राजेंद्र मुथा ( वय ३०, रा.वर्धमान नगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश तापकिर (वय ३३, रा.नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादीचे चंदननगर येथे एंजल कम्युनिकेशन नावाने दुकान आहे. आरोपींनी त्यामधून एस.के.टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या फर्मच्या नावाने खोटी कागदपत्रे देऊन आयडीया कंपनीची १५९ सिम व कमीशनचे ४७ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.
 

Web Title: Both person arrested for 159 simcard purches with fake documents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.