पुण्याचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
By admin | Published: May 4, 2017 02:51 AM2017-05-04T02:51:26+5:302017-05-04T02:51:26+5:30
पुण्याच्या मुला-मुलींच्या संघाने अनुक्रमे औरंगाबाद आणि नाशिक संघाचा पराभव करून राज्यस्तरीय आंतरजिल्हा युथ
पुणे : पुण्याच्या मुला-मुलींच्या संघाने अनुक्रमे औरंगाबाद आणि नाशिक संघाचा पराभव करून राज्यस्तरीय आंतरजिल्हा युथ बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने इंदिरा नॅशनल स्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत चुरशीच्या झालेल्या लढतीत ओम पवार (१०), प्रीतेश कोकाटे (१२) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुणे संघाने औरंगाबाद संघाचा ६३-६१ असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करून अंतिम चारमधील आपली जागा निश्चित केली. पराभूत औरंगाबाद संघाकडून प्रणय वसय्याने २३ आणि हर्षवर्धन अटकारेने २० गुण केले.
मुलींच्या गटात पुणे संघाने नाशिक संघाचा ५२-२० गुणांनी धुव्वा उडविला. पुणे संघाकडून इशा घारपुरेने १०, निधी पार्लेचाने ६, सुधीक्षा कुलकर्णीने ६ गुण करून संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. पराभूत नाशिक संघाकडून अदिती शेट्टीने १३ गुण करून एकाकी लढत दिली.
निकाल (उपांत्यपूर्व फेरी) :
मुले : मुबंई साऊथ वेस्ट : ५४ गुण (अहमद शेख १३, दानिश सय्यद ९) वि. वि. मुबंई साऊथ ईस्ट : ४१ गुण (बिला खान १३, तन्वीर शेख ७०; नागपूर : ६८ गुण : वरून आहूजा १४, सुमेध निपाने १३) वि. वि. चांद्रपूर : २७ गुण (हिमांशू गायकवाड १४, र्हेल मोरोटकर १२); मुंबई नॉर्थ : ६९ गुण (अर्जुन यादव १९, कमलेश राजभर १८) वि. वि. बीड : ३३ गुण (गणेश धोत्रे ६, श्रेयश दगडे ११); मुली (उपांत्यपूर्व फेरी) : धुळे : ६१ गुण (वैष्णवी हजारे १२, करिना सूर्यवंशी १२) वि. वि. सातारा : ५२ गुण (श्रुती भोसले ३०, चैतन्या राजे ६); नागपूर : ४७ गुण (देवश्री आंबेगावकर १४, दवीती संघाणी ११) वि. वि. औरंगाबाद ३९ गुण (खुशी डोंगरे २५, शर्वनी इंदूलकर १०); मुबंई नॉर्थ : ४६ (तनिषा मालवणकर १३, सुझानी पिंटो ९) वि. वि. कोल्हापूर : ३१ गुण (रिया रुईकर ८, अश्विनी चरणकर ६).
(क्रीडा प्रतिनिधी)