व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून दोघांना कोयत्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:46 AM2018-09-30T00:46:37+5:302018-09-30T00:47:09+5:30

एक गंभीर जखमी : इंदापूरमध्ये आठ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

Both of them assaulted with WhitsAp Status | व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून दोघांना कोयत्याने मारहाण

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवरून दोघांना कोयत्याने मारहाण

Next

इंदापूर : तालुक्यातील हेमंत अशोक वाघमोडे (पाटील) यांच्या जिगर ग्रुपमधून दोन तरुण बाहेर पडले, म्हणून त्या तरुणांना जिगर ग्रुपच्या ८ तरुणांच्या टोळक्याने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील वेलपानाच्या बाजारात जबर मारहाण करून, एकाला जातिवाचक शिवीगाळ केल्याने आठ तरुणांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली.

या प्रकरणी सागर महादेव सावंत (वय २१, रा. सुगाव, ता. इंदापूर) याने आरोपी पप्पू मासाळ, सूर्या सुनील मासाळ, रवी मासाळ, काक्या सोलनकर, बबलू मदने, गणेश सोलनकर, राम भाळे (सर्व रा. काटी, ता. इंदापूर) व शिवा खरात (रा. खोरोची, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सागर सावंत आणि त्याचा मित्र सतीश दगडू व्यवहारे हेमंत अशोक वाघमोडे (पाटील) यांच्या जिगर ग्रुपचे सदस्य होते. त्या ग्रुपमध्ये प्रत्येक गावातील १० ते १५ तरुण मुले सदस्य आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून हेमंत वाघमोडे तालुक्यातील गावागावात दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याने व त्याने मध्यंतरी काटी गाव येथे भांडण केल्यामुळे त्या ग्रुपमधून आम्ही दोघे मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी
बाहेर पडलो. शुक्रवारी (दि. २८) दुपारी १२ वाजता सतीश व्यवहारे याला ग्रुपमधील काही सदस्य धमकी देत असल्याचे सतीशने सागरला सांगितले. यानंतर दोघे पाने आणण्यासाठी पानमळ्यात गेले.
त्यानंतर दुपारी २.३० वाजता ते दोघे पाने घेऊन मोटारसायकलवरून निमगाव केतकीला गेले. तेथे दुपारी ३.३० वाजता पान बाजार येथील तळावर मोटारसायकलवरच असताना त्या ठिकाणी पप्पू मासाळ, सूर्या सुनील मासाळ, रवी मासाळ, काक्या सोलनकर, बबलू मदने, गणेश सोलनकर, राम भाले, शिवा खरात दुचाकीवरून येत त्यांच्या
हातातील कोयता, तसेच तलवारीने दोघांना मारहाण करण्यास
सुरुवात केली. आरडाओरड्यामुळे निमगाव केतकी येथील बरेच लोक जमा झाले. यामुळे मारेकरी तेथून पळून गेले. या घटनेत सतीश व्यवहारे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहे.

 

Web Title: Both of them assaulted with WhitsAp Status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.