चोरराजासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:51 AM2017-12-27T00:51:21+5:302017-12-27T05:00:02+5:30

पुणे : दिवसा घरफोडी करणा-या चोरराजासह दोघांना अटक करून गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ५२ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.

Both of them were arrested along with the thief | चोरराजासह दोघांना अटक

चोरराजासह दोघांना अटक

Next

पुणे : दिवसा घरफोडी करणा-या चोरराजासह दोघांना अटक करून गुन्हे शाखेने त्यांच्याकडून ५२ घरफोड्या उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे १६१ तोळे सोन्याचे दागिने, २ दुचाकी आणि घरफोडीचे साहित्य असा ४६ लाख ५८ हजार ७४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. राजेश राम पपूल ऊर्फ चोरराजा (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) व गणेश मारुती काटेवाडे (वय ३०, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ चोरराजा याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गेल्या ३ महिन्यांपासून मागावर होते़ त्यांना पकडण्यासाठी योजना तयार करण्यात आली होती़ पण, तो सातत्याने साथीदार व घरे बदलत असल्याने हाती लागत नव्हता़ प्रॉपर्टी सेलच्या पथकाचे पोलीस नाईक यशवंत खंदारे व हवालदार अनिल उसुलकर यांना चोरराजा व त्याचा साथीदार येवलेवाडी येथील न्यू रोशनी हॉटेल येथे आल्याची माहिती मिळाली़ त्याबरोबर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या तपासात ५२ घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली़ त्यात २०१६ मधील २१ आणि २०१७ मधील ३१ घरफोड्यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून तसेच चिखली येथील घरातून, मित्राकडून आणि एका सोनाराकडून या घरफोड्यांमधील ऐवज जप्त केला आहे़
ही कामगिरी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक इजाज शिलेदार, पोलीस हवालदार अनिल उसुलकर, अमोल भोसले, यशवंत खंदारे, दिनकर भुजबळ, सुभाष कुंभार, दत्ता गरुड, संजय जगताप, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, अनिल शिंदे, निजाम तांबोळी, संजय ढोले यांनी कामगिरी केली आहे़
याबाबत सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी सांगितले, की राजेश ऊर्फ चोरराजा याच्या आईवडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले़ तो वर्षाच्या ७ व्या वर्षापासून चोºया करू लागला़ त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर २००४ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला होता़ यापूर्वी त्याच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल होते़ फेबु्रवारी २०१६ मध्ये तो तुरुंगातून सुटून आल्यानंतर पुन्हा घरफोड्या करू लागला़ तो आपल्याबरोबर नेहमी नवीन साथीदार घेत असे़ ज्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाहीत त्याच सोसायटीत तेही दिवसा घरफोड्या करीत असे़ घर बंद असल्याचे पाहिल्यानंतर कडीकोयंडा तोडून आत शिरून २० मिनिटांत घरफोडी करून तो पसार होत असे़ त्याची एकूण चार वेगवेगळ्या ठिकाणी घरे होती़ त्याने दोन लग्ने केली असून, त्याचे साथीदार त्याला चोरराजा म्हणून ओळखत़ तेच नाव पुढे कायम झाले़
>घरफोड्यांच्या संख्येत घट
गेल्या दोन वर्षांची तुलना करता यंदा घरफोड्यांच्या संख्येत घट झाली आहे़ २०१६ मध्ये १०४४ घरफोड्या झाल्या होत्या़ त्यापैकी ४९८ उघडकीस आल्या होत्या़ २०१७ मध्ये नोव्हेंबरअखेरीस ९११ घरफोड्या झाल्या असून, त्यापैकी दिवसा २६६ आणि रात्री ६४५ घरफोड्या झाल्या आहेत़ त्यापैकी ४०७ उघडकीस आल्या आहेत़

Web Title: Both of them were arrested along with the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.