बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक

By admin | Published: April 12, 2016 04:27 AM2016-04-12T04:27:07+5:302016-04-12T04:27:07+5:30

झोपड्यांमध्ये, तसेच चाळीत राहणाऱ्या परप्रांतीयांकडे लाखो रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बांग्लादेश व भारत सीमेवरील पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या व्यक्ती

Both of them were arrested in fake currency | बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक

बनावट नोटाप्रकरणी दोघांना अटक

Next

पिंपरी : झोपड्यांमध्ये, तसेच चाळीत राहणाऱ्या परप्रांतीयांकडे लाखो रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बांग्लादेश व भारत सीमेवरील पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या व्यक्ती तेथून आणलेल्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. पिंपरी पोलिसांनी एक महिला व एक पुरुष अशा दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस. बी. कलांडीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. कापसे चाळ, पिंपरी येथे समसुद्दीन रेहमान शेख (वय ३०) राहत असलेल्या घराची झडती घेतली असता, एक हजाराच्या १०६, पाचशेच्या ६ बनावट नोटा आढळून आल्या. तसेच १०० च्या ८४ खऱ्या नोटाही आढळून आल्या. घरात ठेवलेल्या एका बॅगेत नव्याने खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू आढळून आल्या. नोटा आणखी कोणाकडे दिल्या आहेत का, असे विचारले असता, नात्याने सावत्र सासू असलेल्या जोहार मन्सूर शेख (वय ५५, रा. भाटनगर, पिंपरी) यांच्याकडे नोटा दिल्या असल्याचे त्याने सांगितले. तिच्या घराची झडती घेतली असता, एका स्टिलच्या डब्यात एक हजाराच्या ६१, ५०० रुपयांच्या दोन नोटा मिळून आल्या. तसेच १०० रुपयांच्या २३ खऱ्या नोटा, १० रुपयांच्या खऱ्या ४२ नोटा आढळून आल्या.बनावट नोटा चलनात आणून त्यातील काही रकमेचे संसारोपयोगी साहित्य खरेदी करून ठेवल्याचे आढळून आले. महिला आणि पुरुष या दोन्ही आरोपींकडून १ लाख ७१ हजारांच्या बनावट नोटा, तसेच ११ हजार ४८० रुपयांच्या खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडील मोबाइल, बँक पासबुक, मोबाईल, तसेच पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रेही जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान अनेक जणांना बनावट नोटांचा फटका बसला असून, बँकेत पैसे जमा करताना नोट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी नोटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसली आहे. बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.
परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, तसेच पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक काळे, पोलीस उपनिरक्षक हरिश माने, आर आर ठुबल,सहायक पोलीस निरीक्षक एस बी पाटील, हवालदार इनामदार लकडे, जावळे, पाटील, खोडगे, महानवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातून संपूर्ण देशात मजूर पुरवले जातात. भारतात विशेषत: महाराष्ट्रात येणारे हे मजूर हातगाड्यांवर ज्यूसविक्री वा अन्य व्यवसाय करतात. हे छोटे व्यवसाय त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नसते. पश्चिम बंगालमधून आणलेल्या बनावट नोटा चलनात आणून त्यावर मिळणारी टक्केवारी हेच त्यांचे खरे कमाईचे साधन आहे. तेथून आणलेल्या हजाराच्या नोटा चलनात आणून मिळणाऱ्या खऱ्या नोटा पाठवून द्यायच्या त्यावरील टक्केवारी स्वत:ला घ्यायची. हजाराची नोट द्यायची शंभर ते दीडशे रुपयांचे साहित्य दुकानातून खरेदी करायचे, दुकानदाराकडून मिळणारी खऱ्या नोटांच्या स्वरूपातील उर्वरित रक्कम ज्यांच्याकडून बनावट नोटा आणल्या, त्यांना परत पाठवायची, असे उद्योग सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव, ताथवडे या परिसरात अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणल्या जात आहेत. शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आठवडा बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चार महिन्यात जोहरा शेख या महिलेने साडेचार लाख रूपये पाठवून दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अशा आरोपींकडे झोपड्यांमध्ये लाखो रूपये आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणात आढळून येऊ लागल्या आहेत.

Web Title: Both of them were arrested in fake currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.