गांजा तस्करीप्रकरणी दोघे अटकेत

By admin | Published: January 13, 2017 03:24 AM2017-01-13T03:24:48+5:302017-01-13T03:24:48+5:30

गांजाची पुण्यामधून होणारी आंतरराज्य तस्करी उघडकीस आणण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले असून

Both of them were detained for trafficking | गांजा तस्करीप्रकरणी दोघे अटकेत

गांजा तस्करीप्रकरणी दोघे अटकेत

Next

पुणे : गांजाची पुण्यामधून होणारी आंतरराज्य तस्करी उघडकीस आणण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले असून, ओडिशाहून आणण्यात आलेला, तसेच पुढे सुरतला नेण्यात येणारा ६ लाख ५८ हजार २३० रुपयांचा ४३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी दिली. आरोपींना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
यशबंता ऊर्फ जसवंत अगस्तीन मंत्री (वय २५), सफल अगादु लिमा (वय २५, दोघेही रा. होडबा, जि. गजपती, ओडिशा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलिसांना ओडिशामधून २ तरुण गांजा आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी दुपारी एकच्या सुमारास स्टेशनजवळील एसटी बसस्थानकाबाहेर सापळा लावला. यशबंता, सफल यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ४३ किलो ८८२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
ही कारवाई परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Both of them were detained for trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.