Pune | खुटबाव येथे भरधाव भरधाव कारने दोघांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 18:09 IST2023-01-07T18:06:04+5:302023-01-07T18:09:03+5:30
खंकाळ हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते...

Pune | खुटबाव येथे भरधाव भरधाव कारने दोघांना चिरडले
केडगाव (पुणे) : खुटबावनजीक असणाऱ्या साळोबा वस्ती येथे भरधाव कारच्या धडकेने दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजता येथे घडली. यामध्ये ज्ञानदेव लाला खंकाळ (वय ६८) व ज्ञानदेव गुलाब शेळके (वय ४२) जागीच ठार झाले आहेत. तर बाळू सखाराम शिंदे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी खंकाळ हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत.
आकाश अनिल जगताप हा खुटबावकडून यवतकडे भरधाव वेगाने कार घेऊन जात होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असणारे खंकाळ व शेळके एका खासगी कार्यक्रमासाठी चालले होते. पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना चिरडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. बाळू शिंदे यावर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.