बाटलीबंद पाण्याचा अवैध धंदा जोरात
By admin | Published: March 20, 2017 04:21 AM2017-03-20T04:21:30+5:302017-03-20T04:21:30+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच तहान भागण्यिासाठी थंड पाण्याची मागणी केली जाते. प्रवास अथवा बाजारात असेल तर बाटलीबंद
पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच तहान भागण्यिासाठी थंड पाण्याची मागणी केली जाते. प्रवास अथवा बाजारात असेल तर बाटलीबंद पाणी घेऊन तहान भागविली जाते. त्यामुळे काही दिवसांपासून बॉटल, २० लिटरचे जार यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. भोसरी एमआयडीसी, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, सांगवी आदी परिसरामध्ये अनधिकृतपणे त्याचे उत्पादन सुरू आहे. दुकानदारांना या बाटल्या व जार स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांच्याकडूनही त्यालाच पसंती दिली जात आहे.
पाणी बॉटल, जार यांचे उत्पादन करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारे प्लांट उभारणे, त्या प्लांटला अन्न व औषध प्रशासन (एफडीआय); तसेच बीएसआय मार्क मिळविणे आवश्यक असते. पाणी योग्यप्रकारे शुद्ध केले जाऊन त्याचा दर्जा चांगला, योग्य असल्याची तपासणी करूनच त्यांना पाणी बॉटल उत्पादनाचा परवाना दिला जातो; मात्र शहराच्या विविध भागांमध्ये एफडीआय व बीएसआय मार्कची कोणतीही परवानगी न घेता, पाणी शुद्धीकरण करण्याचे प्लांट
उघडण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे उघडण्यात आलेल्या प्लांटमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यास फारसा खर्च केला जात नसल्याने त्यांच्याकडून अगदी स्वस्तामध्ये त्या दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. (वार्ताहर)