पोलीस दलातील 'विराट' माऊलींपुढे नतमस्तक; वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:52 PM2022-06-23T19:52:34+5:302022-06-23T20:09:43+5:30

जी ९ या श्वान पथकातील विराट हा श्वान माऊलीपुढे नतमस्तक...

Bowing before virat Maulis of the police force proper preparation of police for the safety of Warkaris | पोलीस दलातील 'विराट' माऊलींपुढे नतमस्तक; वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जय्यत तयारी

पोलीस दलातील 'विराट' माऊलींपुढे नतमस्तक; वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जय्यत तयारी

Next

पुणे : दोन वर्षांनंतर पायी वारी यंदा निघाल्याने पुणे शहरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. लाखो वारकरी पालखीबरोबर चालत पुणे मुक्कामी आले आहेत. पुणेकर त्यांची सेवा करण्यात आज मग्न झाले होते. पुणे पोलीस दलानेही वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व जय्यत तयारी केली होती. पालखी आगमनापासून त्या मुक्कामापर्यंत पोहचलेपर्यंत त्यांच्या मार्गाची माहिती वेबपेजवर देण्यात येत होती. त्याचवेळी सोशल मीडियावर वारीही क्षणचित्रे व त्याला समपर्क ओळी, अभंग देण्यात येत होते. एरवी सरकारी विभागाची माहिती ही रुक्ष असते. पण, पुणे पोलिसांच्या ट्विटरवरील अभंग व त्यावरील फोटोची नेटकऱ्यांनी वाखाणणी केली.

याबाबत पोलीस दलाचे सोशल मीडिया पाहणारे प्रवीण घाडगे यांनी सांगितले की, पोलीस दलाचे सोशल मीडिया हँडल करणारी आमची एक टीम आहे. कोणताही सण, उत्सव असला की आम्ही त्याची अगोदर पूर्ण तयारी करतो. त्यादृष्टीने आवश्यक माहिती गोळा केली जाते. त्याला समपर्क ओळी तयार केल्या जातात. कोणत्या प्रसंगी काय द्यायचे याची रुपरेषा ठरविली जाते. आमच्याबरोबर एक छायाचित्रकारही असतो. आम्ही सर्व एकत्रित प्रयत्नातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचे काम लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आमची टीम काल व आज दिवसभर वारीसोबत होती. त्यातून चांगल्या बाबी टिपण्याचा प्रयत्न केला. त्याचे सोशल मीडियावर कौतुक झाले, याचा आनंद आहे.

सरली दैना करोना महामारीची

आंस वैष्णावांना तुझ्या दर्शनाची,
संता भेटी वैष्णवांची मांदियाळी

नाचतो वारकरी, आली दिवाळी,
तुझ्या भेटीसाठी रे भक्तांची हुरहुर

भेटाया लेकरा तुही झाला आतूर

या सारख्या समर्पक ओळी व आपल्या पालकांच्या खांद्यावर उभे राहून पालखीचे दर्शन घेणारा लहान मुलाचा फोटो यामुळे नेटकऱ्यांना ते अधिकच भावले.

नतमस्तक
दुमदुमली अवघी पुण्यनगरी गजर विठ्ठल नामाचा

धन्य झाले अवघे जन करी चरणस्पर्श माऊलीचा
म्हणे हा विराट भक्त मी माऊलीचा असे श्वान जरी

घडु दे सेवा आम्हा श्वानांचीही चरणी प्रार्थना करी

शहर पोलीस दलातील जी ९ या श्वान पथकातील विराट हा श्वान माऊलीपुढे नतमस्तक होताना

Web Title: Bowing before virat Maulis of the police force proper preparation of police for the safety of Warkaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.