मित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षाचा मुलगा अडकला लिफ्टमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 08:30 PM2019-07-16T20:30:43+5:302019-07-16T20:32:24+5:30
मित्राला भेटण्यासाठी आलेला अकरा वर्षीय मुलगा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना येवलेवाडी येथे घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली.
पुणे : लिफ्टची गियर वायर तुटल्याने अकरा वर्षाचा मुलागा लिफ्टमध्ये अडकल्याची घटना येवलेवाडी येथील श्रृष्टी साेसायटी येथे घडली. साहिल पाेटफाेडे असे लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलाचे नाव हाेते. रहिवाशांना याची माहिती मिळताच अग्शिशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्शिमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुलाला सुखरुप बाहेर काढले.
आज सायंकाळी पाचच्या सुमारास साहिल पाेटफाेडे आपल्या मित्राला भेटण्यासाठी येवलेवाडी येथील श्री सृष्टी साेसायटी या अकला मजली इमारतीत आला हाेता. ताे लिफ्टमध्ये असताना लिफ्टची गियर वायर अचानक तुटल्याने ताे चाैथ्या मजल्यावर अडकला. रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काेंढवा खुर्द अग्शिशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
श्री सृष्टी सोसायटी येथे पोहचल्यावर जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली. लगेच पाचव्या मजल्यावर जवानांनी धाव घेऊन मोठ्या रशीच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची खात्री केली. नंतर दलाकडिल हायड्रोलिक बोल्ड कटर, सर्क्युलर सॉ व टुल किट वापरुन लिफ्टची जाळी व पत्रा कापून साहिलची सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका केली.
ही कामगिरीमधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन चालक शरद गोडसे तसेच जवान अजित बेलोसे, निलेश लोणकर, मंगेश टकले, रवि बारटक्के यांनी सहभाग घेतला.