नदीपात्रात मुलगा बुडाला
By admin | Published: May 3, 2016 03:22 AM2016-05-03T03:22:49+5:302016-05-03T03:22:49+5:30
येथून जवळच असलेल्या उदापूर (ता. जुन्नर) येथून वाहणाऱ्या पुष्पावती नदीत वडिलांबरोबर पोहण्यास गेलेला मुलगा जोरदार पाण्याचा प्रवाह व नदीपात्रातील पाण्याचा अंदाज
ओतूर : येथून जवळच असलेल्या उदापूर (ता. जुन्नर) येथून वाहणाऱ्या पुष्पावती नदीत वडिलांबरोबर पोहण्यास गेलेला मुलगा जोरदार पाण्याचा प्रवाह व नदीपात्रातील पाण्याचा अंदाज
न आल्याने नदीपात्रात बुडून वाहून गेला. त्याचा मृतदेह तीन दिवसांनंतर मिळाला, अशी माहिती ओतूर
(ता. जु्न्नर) पोलीस ठाण्याचे
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली.
नीरज अविश गायकवाड
(वय १६, रा. बांद्रा, मुंबई) असे त्याचे नाव आहे. शनिवारी (दि. ३०) उदापूर (ता. जुन्नर) येथील श्री काळभैरवनाथ महाराजांची यात्रा होती. त्यानिमित्त नीरज आपल्या वडिलांसमवेत आला होता.
पिंपळगाव जोग धरणातून आवर्तन सोडलेले आहे. त्या पाण्याला खूप जोर आहे. उदापूर ग्रामस्थ त्यांचे नातेवाईक शनिवारपासून (दि. ३०) नीरजचा नदीपात्रात शोध घेत होते. सोमवारी (दि. २ मे) नदवेर नेतवड (ता. जुन्नर) येथे धरण आहे. त्या धरणाच्या जलाशयात नीरज याचा मृतदेह पाण्याच्या कडेला मिळाला. ओतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात स्वत: करीत आहेत.