‘बजाज’ कामगारांचा बहिष्कार
By admin | Published: October 21, 2016 04:33 AM2016-10-21T04:33:46+5:302016-10-21T04:33:46+5:30
बजाज आॅटो कंपनीच्या चाकण युनिटमधील काही कामगारांनी गुरुवारी जेवणावर बहिष्कार टाकला. मात्र, कंपनीने अपेक्षित पगार वाढ दिली असल्याने पगारवाढ व बहिष्काराचा
पिंपरी : बजाज आॅटो कंपनीच्या चाकण युनिटमधील काही कामगारांनी गुरुवारी जेवणावर बहिष्कार टाकला. मात्र, कंपनीने अपेक्षित पगार वाढ दिली असल्याने पगारवाढ व बहिष्काराचा काही संबंध नाही, असा दावा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला आहे.
बजाज कंपनीच्या चाकण युनिटमध्ये ९००, तर आकुर्डी युनिटमध्ये ११० कामगार आहेत. या कामगारांना आॅगस्ट २०१४ला
दहा हजार रुपये पगारवाढ
देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोन वर्षांत ३० ते ४० टक्के महागाई वाढली आहे. त्यामुळे मागील पगारवाढीपेक्षा त्यामध्ये ४० टक्के वाढ मिळावी, तसेच बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या मागणीसाठी कामगारांनी काही दिवसांपूर्वी आकुर्डीतील बजाज कंपनीसमोरील शहीद दत्ता पाडाळे यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषणही केले होते. अद्याप मागणी पूर्ण झाली नसल्याने बुधवारी चाकण युनिटमधील
काही कामगारांनी जेवणार
बहिष्कार टाकला. (प्रतिनिधी)
बडतर्फ केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, या
मागणीसाठी काही कामगारांनी जेवणावर बहिष्कार टाकला होता. पगारवाढीचा आणि बहिष्काराचा संबंध नाही. कामगारांची बारा हजार रुपये पगारवाढीची मागणी होती. त्यात कंपनीकडून साडेअकरा हजार रुपये वाढ देण्यात आली आहे. या पगारवाढीबाबत कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
- कैलास झांधरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, मॅन्युफॅक्चरिंग बजाज आॅटो लि.
कामगारांना एकतर्फी पगारवाढ देण्यात आली आहे. व्यवस्थापनाने कामगार संघटनेला विश्वासात घ्यायला हवे होते. कामगारांना चाळीस टक्के पगारवाढ मिळायला हवी. मात्र, व्यवस्थापनाने एकतर्फी पगारवाढ केली. याच्या निषेधार्थ कंपनीतील कामगारांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. यास आम्ही कायदेशीर आव्हान देणार आहे. व्यवस्थापनाने संघटनेला विश्वासात घेऊन प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
- दिलीप पवार, अध्यक्ष, विश्वकल्याण कामगार संघटना