नीरेचे प्रदूषण न रोखल्यास निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:33 PM2019-02-20T23:33:29+5:302019-02-20T23:35:37+5:30

ग्रामस्थांचा संताप : बारामतीतील सात गावांचा एकमुखी निर्णय

Boycott on Elections if No Prevention of Neur Pollution | नीरेचे प्रदूषण न रोखल्यास निवडणुकांवर बहिष्कार

नीरेचे प्रदूषण न रोखल्यास निवडणुकांवर बहिष्कार

Next

सांगवी : बारामती तालुक्यातील सात गावांनी नीरा नदीचे प्रदुषण न रोखल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. सांगवी (ता. बारामती) येथे पार पडलेल्या ग्रामसभेला शेकडो ग्रामस्थ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
नीरा नदीच्या होत असणाऱ्या प्रदूषणाबाबत नदी काठच्या जवळपास सात आठ गावांतील संतप्त नागरिकांनी सांगवी ( ता.बारामती ) येथे बुधवारी (दि. २०) विशेष ग्रामसभेत विविध ठराव करण्यात आला. नदी प्रदुषणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाºया प्रशासन व स्थानिक नेते मंडळींना यावेळी चांगलेच धारेवर धरले. नीरा नदीचे प्रदुषण न रोखल्यास येणाºया लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी प्रतीसंघर्ष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सोमवारी ( दि.२५) बारामती फलटण राष्ट्रीय महामार्गावरील नीरा नदीच्या पुलावर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या ग्रामसभेत सांगवी, कांबळेश्वर, शिरवली, खांडज, नीरावागज, सोनगाव, सांगवी ( ता.फलटण ) येथील विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून प्रदूषण नियंत्रक विभाग व स्थानिक नेते मंडळींच्या विरोधात आवाज उठवला.

ग्रामस्थांसह पाटबंधारे विभागाने देखिल याबाबत प्रशासनाला तोंडी, लेखी निवेदनाद्वारे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, तरी देखिल काही केल्याविना नीरा नदीचे प्रदूषण मुक्त होण्यापासून थांबत नाही. या नदीत बारामती तालुक्यासह, फलटण तालुक्यातील साखर कारखाने, खासगी दूध संघ, कत्तलखान्यातून रात्रीच्या वेळी हे पाणी सोडण्यात येत असते, यामुळे पाण्याचा उग्र वास येऊन पाणी काळेकुट्ट होत आहे. खांडज येथील ग्रामस्थांनी प्रयोगशाळेत नदीच्या पाण्याची तपासणी केली आहे. यावेळी पाण्यात तपासणी दरम्यान मॅग्नेशिअम अ‍ॅसीड, सल्फेड, व क्लोरीनचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. नदीच्या प्रदुषणामुळे शेजारील विंधन विहिरींचे पाणी देखील दुषीत झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

शेतातील पिके जळून जाऊन, जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आली आहेत. तर पिके जळून कर्जबाजारीपणा अंगलट येत असून, जनावरांच्या पिण्यात हे पाणी आल्यास जनावरे दगाऊ शकतात, यामुळे याची भरपाई कोण देणार असा सवाल शेतक?्यांनी उपस्थित केला आहे. पाण्यावर हजारो मृत माशांचा खच तरंगत आहे.यामुळे येथील मच्छीमारांच्या देखिल पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे.
यामुळे वषार्नुवर्ष नदी काठचे हजारो शेतकरी चिंतेत असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ कारवाई करण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात
पैसे घेऊन कारवाई टाळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. यावेळी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राहुल तावरे , अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा युवराज तावरे पाटील, सरपंच हेमलता तावरे, उपसरपंच प्रमोद शिपकूले,नितीन आटोळे, भानुदास जगताप, तंटा मुक्ती अध्यक्ष विलास तावरे, स्वाती तावरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी बनकर, महेश तावरे, अंकुश तावरे, महेंद्र तावरे, पोपट तावरे, प्रकाश तावरे, नंदू नगरे, अर्जुन काळे, हनुमंत तावरे,ग्रामसेवक आर.पी.पवार, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कायदेशीर मार्गाने लढणार; ग्रामस्थांचा निर्धार
कंपनी, खासगी कारखाने यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने दावा दाखल करणार आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन, रास्ता रोको, मोर्चा काढून, येणाºया लोकसभा मतदानावर नदी काठच्या ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्थानिक खासदार, आमदार यांनी लक्ष घालून सभागृहात प्रश्न मांडला तर प्रश्न यावर मार्ग निघेल परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करून आता थेट लोकसभा मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक नेते मंडळींपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
४याबाबत मच्छिमार संघटनेनी याला पाठिंबा दिला आहे. संबंधित कारखाने व खासगी कंपनी यांच्याकडून प्रदूषण नियंत्रक विभागाला भरमसाट पैसे पुरवले जात असतात यामुळे कारवाई करण्या अगोदरच प्रदूषण विभाग संबंधिताना सूचना करून पळवाटा काढल्या जाऊन पुन्हा नव्याने हे पाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुन्हा नव्याने पाणी सोडण्यात येते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

फलटण नगरपरिषदेला ठोठावला दंड
फलटण पासून नीरा नदी पर्यंत जे काही सांडपाणी जात आहे, त्याबाबत आम्ही सर्व्हे केलेला आहे, त्यानुसार फलटण नगरपरिषदे कडून सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मागील दोन महिन्यांपासून फलटण येथील कत्तलखाना बंद आहे. ‘लोकमत’चे वृत्त प्रसिध्द झाल्यानुसार ओढ्यात सांडपाण्याचा एक थेंब देखील सोडता कामा नये, असे फलटण तालुक्यातील खासगी कारखाने, दूध संघ यांना आदेश बजावले आहे.
- बाबासाहेब कुकडे
उपप्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ, सातारा

Web Title: Boycott on Elections if No Prevention of Neur Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.