वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 05:11 PM2023-06-05T17:11:29+5:302023-06-05T17:29:21+5:30

पालखी सोहळ्यात काम बंद करून बहिष्कार न टाकण्याचे आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

Boycott of palanquin celebrations if wages are not received Ambulance drivers will protest | वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार

वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार

googlenewsNext

(बारामती) सांगवी : तीन ते चार महिन्यांपासून थकीत असलेले पुणे जिल्ह्यातील ९० कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन न मिळाल्यास येणाऱ्या पालखी सोहळ्यावर बहिष्कार टाकून आंदोलन करणार असल्याची माहिती कंत्राटी रुग्णवाहिका चालक संघटनेचे अध्यक्ष काळूराम माने यांनी दिली. चोवीस तास आरोग्य विभागात सतर्कपणे काम कंत्राटी रुग्णवाहिका चालक करत असतात, गरोदर मातांना ने आण करणे, अपघातग्रस्त, पोलिओ, मेडिसिन आणणे असे विविध कामे ते बजावत असतात.

राज्यभरातून वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात, आपत्कालीन दरम्यान वारकऱ्यांना जवळच्या रुग्णालयात पोहचविण्याचे काम रुग्णवाहिका चालक करत असतात. मात्र,प्रशासनाच्या व कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णवाहिका चालकांच्या घरावर उपासमारीची वेळ आली आहे. 
जेंव्हा पासुन निविदा प्रक्रिया झाली आहे तेंव्हा पासुन रुग्णवाहिका चालकांना पीएफ रक्कम मिळाली नाही. गेली तिन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. विना वेतन वाहन चालकांनी कोणतेही काम कसे करावे. उदा. पालखी पालखीच्या ड्युटी प्रशासनाने लावल्या आहेत. वेतन नसेल तर पालखीच्या ड्युटी कशा करायच्या अशी  वारंवार विचारणा केली असता जिल्हा परिषदकडुन निधी मिळाल्याशिवाय वेतन देणार नसल्याचे सांगण्यात येते.

आपल्या स्तरावरून नविन निविदा जाहीर केली परंतू,आपण मागिल निविदा धारकाने वाहन चालकांचे वेतन दिले कि, नाही याची चौकशी करायला हवी होती. असे आरोग्य जिल्हाधिकारी यांना रुग्णवाहिका चालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंत्राटदाराने आमचे वेतन दिले नाही, तरी सुध्दा वाहन चालक २४ तास काम करित आहेत.  मागिल दोन वर्षापासून मोबईल भत्ता प्रति महिना २००रू व प्रसुती २००रू प्रमाणे मिळाले नाहीत. ती रक्कम गतवर्षी वाहन चालकांना मिळावी. गेली १७ वर्षापासुन ठेकेदारांकडून वाहन चालकांची पिळवणूक होत आहे. कमी वेतनात व वेळेवर न होणाऱ्या वेतनात वाहन चालकांनी परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा. महागाई वाढ झाली आहे.वाहन चालकांची पिळवणूक थांबवावी व आपण वाहन चालकांना न्याय मिळवून द्यावा व अशी विनंती आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बहिष्कार न टाकता माउलीची सेवा करावी

हा विषय राज्यस्तरावरील आहे, संपूर्ण राज्यात एजन्सी मार्फत कंत्राटी चालक भरले जातात, त्यांचा निधी राज्य सरकारकडून थांबलेला आहे. रुग्णवाहिका चालकांचे वेतन राज्य स्तरावरून होते. त्यांचे अनुदान अद्याप पर्यंत आलेले नाही. अनुदान मिळण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. आज ना उद्या रुग्णवाहिका चालकांना वेतन मिळणार आहे. त्यामुळे पालखी सोहळा माऊलीची सेवा आहे. यामुळे चालकांना आवाहन आहे की, पालखी सोहळ्यात बहिष्कार न टाकता माउलीची सेवा करावी,अनुदान येत नाही तोपर्यंत कंत्राटराला वेतन देण्यासाठी सांगण्यात आले आहे. - डॉ. रामचंद्र हंकारे (आरोग्य जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे. )

Web Title: Boycott of palanquin celebrations if wages are not received Ambulance drivers will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.