महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:42+5:302021-04-29T04:08:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : इतरांशी बोलते या कारणावरुन झालेल्या भांडणात ठेकेदार प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला व ...

Boyfriend arrested for murdering woman | महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराला अटक

महिलेचा खून करणाऱ्या प्रियकराला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : इतरांशी बोलते या कारणावरुन झालेल्या भांडणात ठेकेदार प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला व त्यानंतर ओळख पटू नये, म्हणून चेहऱ्यावर दगड टाकून तो विद्रुप केल्याचा प्रकार लोहगावमध्ये घडला होता. विमानतळ पोलिसांनी खुनाचा हा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून प्रियकराला अटक केली.

संतोष महादेव राठोड (वय ३१, रा. साईपार्क लेबर कॅम्प, लोहगाव) असे त्याचे नाव आहे. राठोड हा ठेकेदार असून ही महिला तेथे कामाला होती. लोहगाव येथील कुबेर पार्कसमोरील डी. वाय. पाटील कॉलेज रोडवर मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक मंगेश जगताप व तपास पथकाला आरोपींच्या शोधाचा आदेश दिला होता. त्याच दरम्यान या महिलेचे नातेवाईक तिचा शोध घेत होते़ त्यांना या महिलेचे कपडे व अंगावरील खुणा दाखविल्यावर त्यांनी तिला ओळखले़ या महिलेचे संतोष राठोड याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तो तिला वेळोवेळी पैशांची व इतर मदत करीत असे. मात्र, ही महिला राठोड व्यतिरिक्त इतर लोकांचे बरोबर बोलते, याचा त्याला राग होता.

राठोड याने तिला समजावून सांगूनही तिच्यात फरक पडत नसल्याने त्या दोघांमध्ये भांडणे झाली होती. राठोड याने तिला २६ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता मोटारसायकलवरुन घटनास्थळी आणले. तेथील शेतामध्ये तिचा गळा दाबून ती बेशुद्ध झाल्यावर शेतातील मोठा दगड तिच्या डोक्यात घालून खून केला. राठोडने खून केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक मंगेश जगताप अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Boyfriend arrested for murdering woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.