लग्न करायला जाताना 'तो' कॉल आला अन् त्यानं तिच्यावर केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 11:38 AM2019-09-07T11:38:05+5:302019-09-07T11:51:13+5:30

रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

boyfriend attacks his girlfriend with knife in pune | लग्न करायला जाताना 'तो' कॉल आला अन् त्यानं तिच्यावर केले सपासप वार

लग्न करायला जाताना 'तो' कॉल आला अन् त्यानं तिच्यावर केले सपासप वार

Next
ठळक मुद्देरागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.युवराज दिगंबर ढेरे असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

पुणे - रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती येथील गोजुबावी येथे 2 सप्टेंबर रोजी एक तरुणी जखमी अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. युवराज दिगंबर ढेरे (22, रा. तोरडमल वस्ती, साडेसतरा नळी) असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील मौजे गोजुबावी येथे 2 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली होती. कोणीतरी तिच्यावर वार करुन तिच्याजवळील सोन्याच्या रिंगा, मोबाईल, ओळखपत्र असा ऐवज घेऊन पसार झालं होतं.  चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झाला असावा, असा पोलिसांना सुरुवातीला संशय होता. ही तरुणी बेशुद्ध असल्याने नेमका काय प्रकार झाला याची माहिती मिळत नव्हती. या तरुणीची ओळख पटल्यानंतर ती हडपसर येथे राहणारी असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेत्या तपासात या तरुणीबरोबर युवराज ढेरे याला अनेकांनी पाहिल्याचे सांगितले. त्यावरुन युवराज याला पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या सर्व प्रकाराचा उलघडा झाला आहे. 

युवराज व ही तरुणी यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही लग्न करणार असल्याने त्यासाठी ते बारामतीकडे जात होते. त्यावेळी युवराज हा या तरुणीला गाडी शिकवत होता. त्यामुळे तरुणीचा मोबाईल युवराजकडे होता. तेव्हा तिच्या मोबाईलवर एकाचा फोन आला. युवराज याने हा फोन घेतला. तो काही बोलणार तितक्यात फोन करणाऱ्याने तरुणीने फोन उचलला असे समजून ‘आय लव यु’ असे म्हणून बोलायला सुरुवात केली. त्याचे बोलणे ऐकून युवराज संतापला. त्याने या तरुणीला आपण लग्न करणार असताना तुझे दुसऱ्याबरोबरही प्रेम संबंध आहेत का अशी विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात युवराजने तिच्यावर वार करुन तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिच्या अंगावरील दागिने, मोबाईल व तिचे ओळखपत्र घेऊन तो पळून गेला होता. ही तरुणी अजूनही बेशुद्धावस्थेत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने युवराज ढेरे याला अधिक तपासासाठी बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 

Web Title: boyfriend attacks his girlfriend with knife in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.