सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले- डाॅ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 03:22 PM2021-11-29T15:22:23+5:302021-11-29T15:39:02+5:30

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब ...

brahminism hidden in all castes said by dr shripal sabnis | सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले- डाॅ. श्रीपाल सबनीस

सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले- डाॅ. श्रीपाल सबनीस

googlenewsNext

पुणे: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वतीने पहिला ‘राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री ललिता आणि डाॅ. श्रीपाल सबनीस यांना प्रदान करण्यात आला. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोहळ्याला माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हाणे, कवी चंद्रकांत वानखेडे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

बंधुता प्रकाशनच्या संचालिका मंदाकिनी रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील १५ महिलांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यात वैशाली मोहिते (पुणे), मधुराणी बनसोड (वाशिम), शिल्पा परुळेकर (वसई), अक्षता देशपांडे (मुंबई), दीपिका सुतार (सिंधुदुर्ग), चंदना सोमाणी (पुणे), माधुरी चौधरी (औरंगाबाद), शरयू पवार (पुणे), जयश्री पाटकर (अमरावती), सरिता पवार (सिंधुदुर्ग), डॉ. नीलम जेजूरकर (राजगुरूनगर), डॉ. सुनीता खेडकर (पुणे), पौर्णिमा खांबेटे (पुणे), मनीषा शिंदे पाटील (पलूस, सांगली) यांचा समावेश होता.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘लेखक, शिक्षक, शेतकऱ्यांचा कैवारी, समाजसुधारक, क्रांतिकारक, बहुजनांचा वाली असलेल्या फुले यांचा विचार अंगीकारण्याची गरज आहे. सगळे ब्राह्मण वाईट आणि सगळे बहुजन चांगले असे नाही. फुले यांना सर्वच समाजातील, जातीतील चांगल्या लोकांची साथ लाभली. सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य दडलेले आहे’

आपापल्या जातीतील ब्राह्मण्य निर्मूलन करण्याची गरज आहे. समाजात बंधुत्वाची भावना रुजली पाहिजे. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे परखड विचार समाजाला आरसा दाखविणारे आहेत. त्यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे जीवनात नेमके काय करायचे, याची दिशा मिळते.

- चंद्रकांत दळवी, माजी विभागीय आयुक्त

चंद्रकांत वानखेडे यांनी काव्यात्मक मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजूरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले.

Web Title: brahminism hidden in all castes said by dr shripal sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.