पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने ब्राम्हो परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:21+5:302020-12-04T04:28:21+5:30
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे आयोजन केले आहे. प्रार्थना समाजाच्या १५० व्या वर्षानिमित्त कोरोनाच्या ...
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने १३० व्या ब्राह्मो परिषदेचे आयोजन केले आहे. प्रार्थना समाजाच्या १५० व्या वर्षानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परिषद होणार आहे. ४ आणि ५ डिसेंबर रोजी परिषद होणार आहे, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाचे चिटणीस दिलीप जोग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ब्राह्मो परिषदेचे अध्यक्ष ब्राह्मो समाज दिल्लीचे अध्यक्ष संजोय चंदा असणार आहेत. त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.डॉ. राजा दिक्षीत, फॉरेन्सिक मेडिसिन महाराष्ट्र राज्याच्या माजी अध्यक्षा डॉ. वसुधा आपटे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधनाचे भूपाल पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमाळकर, सुधीर देवरे सहभागी होणार आहेत.
तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजासोबत जोडणे, हा परिषदेचा मुख्य विषय असणार आहे. याच विषयावर परिषदेत मान्यवर बोलणार आहेत. शुक्रवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सत्राला सुरुवात होईल. पुण्यात यापूर्वी ४ ब्राह्मो परिषदा झाल्या आहेत. सन १९९१, २००४ आणि २०१२ मध्ये ३ री परिषद पुण्यात झाली, तर ४ थी परिषद यंदा होणार आहे.
दिलीप जोग म्हणाले, पुणे प्रार्थना समाजाने मानवतावादी, समानतावादी, आध्यात्मिक, सद्वर्तन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ही पंचसूत्री स्विकारली. या पंचसूत्रीच्या सहाय्याने ज्ञानाधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाशी कसे जोडता येईल, हा परिषदेचा मुख्य विषय आहे.
यामध्ये तरुणाईसोबत ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी होणार आहेत. परिषदेत दोन सेमिनार होणार आहेत. पहिल्या सेमिनारमध्ये तरुणाईला ब्राह्मो आणि प्रार्थना समाज सोबत जोडण्याचा आराखडा आणि दुसऱ्या सेमिनार मध्ये तरुणाईच्या ब्राह्मो आणि प्रार्थना समाजाकडून अपेक्षा या विषयावर विचार मंथन होणार आहे