ब्राह्मोसच्या क्रुझला पुण्याचे बुस्टर,एचईएमआरएल घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:52 AM2017-11-24T00:52:55+5:302017-11-24T00:53:29+5:30

पुणे : सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस या जगातील सर्वांत वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला.

BrahMos Cruze to Booster, HEMRL to take initiative | ब्राह्मोसच्या क्रुझला पुण्याचे बुस्टर,एचईएमआरएल घेणार पुढाकार

ब्राह्मोसच्या क्रुझला पुण्याचे बुस्टर,एचईएमआरएल घेणार पुढाकार

googlenewsNext

पुणे : सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस या जगातील सर्वांत वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. या क्षेपणास्त्राच्या प्रारंभीच्या स्टेजमधील बुस्टर यंत्राची निर्मिती आता भारतातच करण्यात येणार असून, पुण्यातील हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) या संस्थेमार्फत ते बनविण्यात येणार आहे, अशी माहिती डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेचे डायरेक्टर जनरल (आर्मामेंट अँड काँबॅक्ट इंजिनिअरिंग) पी. के. मेहता यांनी दिली.
पुण्यात हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) येथे ११ व्या हाय एनर्जी मटेरियल सायन्स आणि प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. ‘इमर्जिंग ट्रेंड इन हाय परफॉर्मन्स- इन्सेन्सिव्हिटी अँड ग्रीन एनर्जी’ या विषयावर ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी एचईएमआरएलचे डायरेक्टर के. पी. एस. मूर्ती, भारत डायनामिक्स लिमिटेडचे अध्यक्ष व्ही. उदय भास्कर उपस्थित होते.
मेहता म्हणाले, देशाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात एचईएमआरएलची महत्त्वाची भूमिका आहे. क्षेपाणास्त्र हवेत उडण्याच्या पहिल्या अवस्थेत लागणाºया यंत्रापासून ते शेवटच्या अवस्थेपर्यंत एचईएमआरएलतर्फे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र असून, ते भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी संयुक्तपणे निर्माण केले आहे. या क्षेपणास्त्रातील महत्त्वाचे प्रारंभीच्या स्टेजमधील बुस्टर इंजिन हे रशियातून येत होते. मात्र, या पुढे हे बुस्टर देशातच बनविण्यात येणार आहे. पुण्यातील एचईएमआरएलद्वारे त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. भविष्यात या क्षेपणास्त्रात संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सध्या हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, पाण्यातून तसेच आता हवेतूनही डागता येऊ शकते. सुखोई ३० या विमानामुळे या क्षेपणास्त्राची मारकक्षमता वाढली आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. डीआरडीओ संस्थेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भविष्यात शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. लष्कराला लागणारे टॅक्टिकल तसेच आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार आहे.
>पर्यावरणपूरक स्फोटकांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील
शस्त्रास्त्रांध्ये वापरण्यात येणारी स्फोटके पर्यावरणपूरक कशी असतील, यावर संशोधन सुरू आहे. स्फोटकामधून निघणारे कार्बन मोनोक्साईडसारखे घटक अतिशय हानिकारक असतात. हे घटक कमी करण्यासाठी एचईएमआरएलद्वारे संशोधन सुरू आहे. अशा दोन स्फोटकांची निर्मिती करण्यात आली आहे. अजून त्यावर चाचण्या घेणे सुरू आहे, असे एचईएमआरएलचे चेअरमन के. पी. एस. मूर्ती यांनी सांगितले.
भारतीय बनावटीचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र लवकरच लष्करात होणार दाखल...
इस्राईलकडून भारताने स्पाईक क्षेपणास्त्र खरेदी करण्यास नकार दिला आहे. डीआरडीओमार्फत या स्वदेशी बनावटीचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात येत आहे. या क्षेपणास्त्राच्या काही चाचण्या झाल्या आहेत.
हे क्षेपणास्त्र भारतीय बनावटीच्या अर्जुन या रणगाड्यातून डागता येणार आहे. २०१८मध्ये आणखी काही चाचण्या करून २०१९पर्यंत हे क्षेपणास्त्र लष्कराला देण्यात येणार असल्याचे एचईएमआरएलचे चेअरमन के. पी. एस. मूर्ती आणि पी. के. मेहता यांनी सांगितले.

Web Title: BrahMos Cruze to Booster, HEMRL to take initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे