ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

By admin | Published: January 4, 2016 12:57 AM2016-01-04T00:57:15+5:302016-01-04T00:57:15+5:30

शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक

Braille script requires modernization | ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

ब्रेल लिपीला हवी आधुनिकतेची जोड

Next

चिंचवड : शासनाच्या विविध योजनांमधून अंधासाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. ब्रेल लिपीने अंधांना दिशा दिली असली, तरीही या शिक्षण पद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याशिवाय अंध बांधवांचे जीवन प्रकाशमय होणार नाही, असे मत अंध शिक्षणप्रणालीत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.
अंध व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु यातील उदासीन धोरणांमुळे याची अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव अशा योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंध:कारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरीकाठी काठी अंधांच्या हाती कधी पडणार, असा सवाल त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.
अंधांच्या समस्या व शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी अग्रेसर असणारे सतीश नवले यांनी अंध व्यक्ती हा समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो, असे मत व्यक्त केले आहे. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने अशा विद्यार्थ्याला सहानुभूती दाखवून व त्यांच्यावर दया करून त्याला सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे. यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातून मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते. अंध व्यक्ती उत्पादक घटक बनल्यास पालकांना व समाजाला त्याचा भार वाटणार नाही. त्यांना जखडवून ठेवत अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्त्वाचे आहे. (वार्ताहर)

Web Title: Braille script requires modernization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.