ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावा

By admin | Published: April 1, 2017 02:18 AM2017-04-01T02:18:48+5:302017-04-01T02:18:48+5:30

देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे

Brake the breakdown | ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावा

ब्रेकडाऊनला ‘ब्रेक’ लावा

Next

पुणे : देखभाल-दुरुस्तीअभावी सातत्याने रस्त्यातच बंद पडणाऱ्या (ब्रेकडाऊन) बसेसचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सध्याचे ब्रेकडाऊनचे प्रमाण २० ते ३० टक्के असून, ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणावे, असा आदेश त्यांनी सर्व आगारप्रमुखांना दिला आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच महत्त्वाचे निर्णय घेऊन पीएमपीच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी कामाची वेळ बदलण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कामावर वेळेत न आलेल्या ११७ कर्मचाऱ्यांचा दिवस विनावेतन करण्यात आला. ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठीही आता त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. सद्यस्थितीत पीएमपीच्या २७५ ते ३०० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच पीएमपीला उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. पीएमपीची प्रतिमाही खराब झाली आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या व भाडेतत्त्वावरील एकूण २०३६ बसेस असून, त्यातील सुमारे १३०० ते १४०० बसेस दररोज मार्गावर असतात. मात्र त्यातील सरासरी २७५ ते ३०० बसेस रोज अनेक कारणांमुळे ब्रेकडाऊन होत आहेत. सध्या हे प्रमाण २० ते ३० टक्क्यांच्या घरात आहे. हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी अनेक बस सातत्याने बंद पडतात. त्यासाठीही मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले असून, त्याबाबत सर्व आगारप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.

सर्व आगारात ई-तिकिटिंग
पीएमपीच्या सर्व आगारांमध्ये ई-तिकिटिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मी-कार्डचा वापर  करणे सर्व आगारांसाठी शक्य होणार आहे. आतापर्यंत ११ आगारांमध्येच ई-तिकिटिंगचा वापर होत होता. उर्वरित दोन आगारांमध्येही ही  ई-तिकिटिंग यंत्रे उपलब्ध झाली आहेत. मी-कार्डसाठी हे यंत्रणा आवश्यक आहे.

Web Title: Brake the breakdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.