विदर्भातील ब्रम्हपूरी देशात सर्वाधिक तप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:48+5:302021-03-09T04:14:48+5:30
पुणे : विदर्भाच्या बर्याच भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून ब्रम्हपूरी येथे रविवारी कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअसची ...
पुणे : विदर्भाच्या बर्याच भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून ब्रम्हपूरी येथे रविवारी कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ही देशातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे. आज ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक कमाल तापमान ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १४.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
विदर्भ आता तापू लागला असून सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशाने वाढ झाली आहे. ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक ४.८ अंशाची वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या बर्याच भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. १०, ११, १२ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.६, लोहगाव ३६.६, जळगाव ३७.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्वर ३१.१, मालेगाव ३८.८, नाशिक ३५.५, सांगली ३७.२, सातारा ३६.१, सोलापूर ३८.२, मुंबई ३१.६, सांताक्रुझ ३५, अलिबाग ३१, रत्नागिरी ३६.७, पणजी ३४, डहाणु ३२, औरंगाबाद ३६.२, परभणी ३७.५, नांदेड ३७.५, बीड ३७.३, अकोला ३९.५, अमराती ३८.२, ब्रम्हपूरी ४०.१, चंद्रपूर ३७, नागपूर ३८.३, वाशिम ३७.८.