दारूभट्ट्या उद्ध्वस्त, नारायणगावला तिघांवर गुन्हा : १ लाख १५ हजारांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:36 AM2017-09-20T00:36:22+5:302017-09-20T00:36:24+5:30

धनगरवाडी परिसरातील तीन अवैध गावठी हातभट्टी तयार करणा-या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल व गावठी हातभट्टी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली.

Breach of ammunition, Narayanagawa crime against three: 1 lakh 15 thousand goods seized | दारूभट्ट्या उद्ध्वस्त, नारायणगावला तिघांवर गुन्हा : १ लाख १५ हजारांचा माल जप्त

दारूभट्ट्या उद्ध्वस्त, नारायणगावला तिघांवर गुन्हा : १ लाख १५ हजारांचा माल जप्त

Next

नारायणगाव : धनगरवाडी परिसरातील तीन अवैध गावठी हातभट्टी तयार करणा-या दारूभट्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकून १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल व गावठी हातभट्टी दारू जप्त करून जागीच नष्ट करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. या प्रकरणी नीलेश विजय मारवाडी, बेबी युवराज बिनावत, रिना आनंदा राजपूत (सर्व रा. धनगरवाडी, ता. जुन्नर) यांना अटक करण्यात आली असून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी येथे गावठी हातभट्टी तयार करण्यात येत असल्याच्या माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पथक तयार करून मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास धनगरवाडी येथे चिक्कूच्या बागेजवळ जाणा-या रोडजवळ नीलेश मारवाडी याच्या घराजवळ गावठी हातभट्टी तयार दारू, कच्चे रसायन, इतर साहित्य, दुचाकी असे ९२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यानंतर बेबी युवराज बिनावत यांच्या घराजवळ १० लिटर गावठी दारू, २०० लिटर दारू बनविण्याचे कच्चे रसायन व इतर साहित्य असे ११ हजार रूपयांचा मुद्देमाल सापडला. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गोरड व ८ कर्मचा-यांनी केली.
>दौंडला ९ ठिकाणी दारूअड्ड्यांवर छापे
दौंड : शहरात वेगवेगळ्या ९ ठिकाणी अवैध दारूअड्ड्यांवर पोलीसांनी छापा टाकून ७ जणांना अटक केली आहे. दोघे जण फरार झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार सुनील बगाडे यांनी दिली. जरिना राठोड, नवनाथ काळे, शांताराम पवार, बबिता देवकाते, राजू जाधव, विशाल कुट्टी यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, गजानन जाधव, भानुदास जाधव, अमोल गवळी, असिफ शेख, राजू शिंदे, तन्वीर सय्यद, धनंजय गाढवे या पोलिसांनी ठिकठिकाणी छापा टाकून ३४०० रुपयांची दारू जप्त केली. यात ५०० लिटर रसायन जप्त केले आहे.
> अवैध गावठी दारूधंद्यांवर वालचंदनगर पोलिसांचे छापे
वालचंदनगर : कळंब, चिखली, वालचंदनगर परिसरात विविध ठिकाणी अवैध गावठी दारूविक्री करणा-यावर वालचंदनगर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुद्देमालासह विविध साहित्य जप्त केले. कळंब, चिखली परिसरात गावठी अवैध देशी दारूविक्री केले जात असल्याची खबर मिळाल्याने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, त्याचे सहकारी यांनी छापा टाक ला. या वेळी सुनील किसन सोनवणे (रा. नारळीबाग, कळंब) यांच्याकडील ५ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आले.

Web Title: Breach of ammunition, Narayanagawa crime against three: 1 lakh 15 thousand goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.